एमजी मोटर इंडियाचा 'एमजी सेवा' उपक्रम ब्रँड मूल्य निर्मितीत निभावली महत्वपूर्ण भूमिका ~मुंबई, ९ फेब्रुवारी २०२२: वर्ष २०१८ मध्ये स्थापना झाल्यानंतर आणि आपले पहिले उत्पादन भारतात आणण्यापूर्वी एमजी मोटरने समाजासाठी कार्य करण्यास सुरूवात केली होती. जगातील सर्वाधिक आवडीच्या कार ब्रँड्सपैकी एक असलेल्या एमजीने समाजावर आधारित दृष्टीकोनाद्वारे आपले स्थान भारतात सिद्ध केले. त्यांच्या सामाजिक उपक्रमाचे ध्येय 'सेवा' असून त्याचा अर्थ 'निःस्वार्थ सेवा', 'मदत' आणि 'काळजी' असा आहे. कंपनीच्या मुख्य पायांपैकी एक 'समाज' असून ओईएमचे उद्दिष्ट एमजी सेवामार्फत सर्व समाजांना आणि विशेषतः त्यांच्या कार्यक्षेत्रात स्थित असलेल्या समुदायांना सेवा देण्याचे आहे.


     एमजी सेवाच्या छत्राखाली एमजी मोटर्सने देशभरातील समाजाच्या गरजांप्रति कार्यरत असलेल्या रूग्णालये, आरोग्यसेवा आणि धर्मादाय संस्थांना ३० पेक्षा अधिक रूग्णवाहिका दान केल्या आहेत. या उपक्रमाची सुरूवात झाल्यापासून ६०,००० पेक्षा अधिक मुलींच्या शिक्षणाला आधार मिळाला आहे.


      एमजीच्या नीम उपक्रमातून आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक महिलांना सहभागी करून घेतले आहे. त्यातून हल्लोळ प्लान्टमध्ये जवळपासच्या ग्रामीण क्षेत्रात कौशल्य प्रशिक्षण देणे शक्य झाले आहे. एमजी सेवाअंतर्गत इतर उपक्रमांमध्ये अकुशल महिलांना मास्क बनवण्यासाठी कौशल्यपूर्ण बनवणे, गुरगाव येथील १०० शिक्षकांना आणि ४ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना रस्तासुरक्षेबाबत प्रशिक्षित करणे आणि ४,००० पेक्षा अधिक पोलिस कार्सना सॅनिटाइज करणे यांचा समावेश आहे.


     सामाजिक उपक्रमांसह एमजीचे उद्दिष्ट प्रत्येकासाठी एकसमान क्षेत्र तयार करण्याचे आहे. त्यांचा विश्वास आहे की, भारत हे अदभुत बुद्धिमत्तेची भूमी आहे आणि कंपनीला हे टॅलेंट आपली खरी क्षमता पूर्ण करू शकेल यासाठी योग्य प्रकारे आधार द्यायचा आहे. एमजी सेवा आपल्या समाजातील वंचित समुदायातील प्रत्येकाला सक्षम करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम हाती घेत आहे.


■एमजी सेवाचे काही उपक्रम आणि त्यांचा समाजावरील प्रभाव खालीलप्रमाणे आहे. कोविड १९ शी संबंधित समाज सेवा उपक्रम:


    एमजी होप: एमजी सेवाच्या माध्यमातून समाजाची सेवा करण्याच्या आपल्या वचनबद्धतेनुसार एमजी मोटर इंडियाने आपला नवीन उपक्रम होप आणला आहे. त्याद्वारे एमजीकडून कोविड-१९ जागतिक साथीदरम्यान अनाथ झालेल्या ३० मुलांच्या शिक्षणासाठी शैक्षणिक मदत दिली जाईल. विक्रम राय (राष्ट्रीय प्रमुख, जीई एव्हिएशन) यांनी या महान उपक्रमाचा पहिला टप्पा सुरू केला आहे आणि त्यांनी आतापर्यंत १४ मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी उचलली आहे. होपच्या माध्यमातून एमजी मिशन शिक्षाला पाठबळ देत आहे. हा उपक्रम बडोदा येथील युनायटेड वे नावाच्या स्वयंसेवी संस्थेने सुरू केला असून त्यातून अनाथ झालेल्या मुलांना आपले शालेय शिक्षण पूर्ण करण्यासाठी मदत केली जाते. प्रत्येक मुलासाठी शालेय शुल्क आणि शैक्षणिक किट यांच्यासह शिक्षणाचा वार्षिक खर्च एमजी मोटर इंडियाकडून केला जाईल.


    हेक्टर एम्ब्युलन्स: एमजी हेक्टर एम्ब्युलन्सने हेक्टर एम्ब्युलन्सचा विकास करून प्रादेशिक आरोग्यसेवा संस्थांच्या प्रयत्नांना आधार दिला आहे. या रूग्णवाहिकेत ऑटो लोडिंग स्ट्रेचर, ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा, औषध कॅबिनेट आणि पाच निकषांचे मॉनिटर, अतिरिक्त सॉकेटसह इन्व्हर्टर, एक लाइट बार आणि सायरन तसेच अग्निशामक यांचा समावेश आहे. एमजी मोटरने समाजाच्या गरजेसाठी काम करणाऱ्या देशभरातील रूग्णालये, आरोग्यसेवा आणि विश्वस्त संस्थांना ३० पेक्षा अधिक रूग्णवाहिका दान केल्या आहेत.


     एमजी इम्पॅक्ट अध्ययन केंद्रे: वंचित मुलींसाठी अधिक चांगल्या भविष्याची हमी देण्यासाठी इम्पॅक्टसोबत आपली भागीदारी पुढे नेताना जून २०२० मध्ये 'डिजिटल सेंटर्स - ई-शिक्षा एक नयी दिशा' ही मोहीम चालवली होती. त्याचे उद्दिष्ट भारतातील अत्यंत दुर्गम ठिकाणी ई-लर्निंग केंद्रे स्थापित करण्याचे होते. ई-शिक्षा ऑनलाइन डिजिटल लर्निंग केंद्रांचे अनावरण मार्चमध्ये कोविड-१९ चा उद्रेक होण्यापूर्वी केले गेले होते, जेणेकरून मुलींच्या शिक्षणाला पाठबळ दिले जाऊ शकेल.


        एमजीने आतापर्यंत ५० पैकी १५ इम्पॅक्ट लर्निंग सेंटर्सचे अद्ययावतीकरण इम्पॅक्ट-टेक स्टुडिओजमध्ये (डिजिटल अध्ययन केंद्रे) करण्यासाठी मदत केली आहे आणि त्यासाठी तंत्रज्ञानाशी जोडले गेले आहेत. एमजी आणि इम्पॅक्ट यांनी २०१८ मध्ये भागीदारी करून भारतातील वंचित मुलींच्या शिक्षणाला मदत केली आहे. या भागीदारीचे उद्दिष्ट ६ वर्षे आणि १४ वर्षे वयोगटातील मुलींना दर्जेदार शिक्षण देण्याचे आहे. 


     वर्थ वेटिंग फॉर: लिंग समानता आणि समाज विकासाच्या आपल्या मुलभूत वचनबद्धतेचा भाग म्हणून एमजी मोटर इंडिया हेक्टरसोबत मुलींच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करत आहे. या कार निर्मात्या कंपनीने आपला वर्थ वेटिंग फॉर प्रोग्राम सुरू केला आहे. त्यातून एमजी हेक्टर बुक केलेल्यांना सामाजिक कार्याचा भाग होता येईल आणि ते आपल्या नियत वाहन डिलिव्हरीसाठी प्रतीक्षा करू शकतील. इम्पॅक्ट स्वयंसेवी संस्थेसोबत आपली भागीदारी विस्तारित करत असताना आपण हेक्टर ग्राहकांनी केलेल्या दर दोन आठवड्यांच्या प्रतीक्षेसाठी एका मुलीच्या शिक्षणात ते योगदान देतील अशी घोषणा केली आहे.


     वैविध्यपूर्णता उपक्रम: एमजीचा विचार या पूर्वापार चालत आलेल्या बाबी बदलून एक सकारात्मक प्रभाव टाकण्याचे आणि त्याद्वारे कार्यस्थळी लिंग वैविध्यपूर्णतेला चालना देणारी संस्कृती निर्माण करण्याचे होते. एमजीमध्ये वैविध्यपूर्णता फक्त लिंग प्रमाणाशी संबंधित नाही तर विविध क्षेत्रातील, पार्श्वभूमीच्या, वांशिकतेच्या, धर्म, प्रदेश, कंपन्या आणि लिंगांच्या व्यक्तींना एक सर्वसमावेशक मनुष्यबळ निर्मितीसाठी जोडण्याच्या दिशेने प्रयत्न केले जातात. त्यांची मूल्ये स्पीड या शब्दाने निश्चित केली गेली आहेत. त्यात एस म्हणजे स्टार्टअप संस्कृती, पी म्हणजे वेड, ई म्हणजे काम करण्यातील सुलभता आणि डी म्हणजे वैविध्यपूर्णता होय.


    एमजीने आपल्या स्थापनेपासूनच लिंग वैविध्यपूर्णतेच्या ध्येयाच्या दिशेने प्रवास सुरू केला आणि आता त्यांच्याकडे ३७ टक्के महिला कर्मचारी आहेत. ओईएमने नीम, जेनेसिस तसेच इतर अनेक भविष्याधारित मोहिमांचे नेतृत्व केले आहे. कंपनीने 'ड्राइव्ह हर बॅक' नावाचा एक उपक्रमही सुरू केला आहे. त्यातून कामातून ब्रेक घेतलेल्या महिलांना मदत करण्यासाठी आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील त्यांचा पुनर्प्रवेश सुलभ करण्यासाठी मदत केली जाते. एमजीने सरकारकडून चालवला जाणारा नीम हाही उपक्रम २०१८ मध्ये सुरू केला आहे. पहिल्या बॅचमध्ये एकूण २५ महिला सहभागी झाल्या आणि आम्ही आतापर्यंत ५०० पेक्षा अधिक महिलांशी जोडून घेतले आहे.


      उपक्रमांचा प्रभाव: एमजी सेवा हे आमचे प्रमुख व्यासपीठ आहे, ज्याचे उद्दिष्ट जवळच्या समुदायांना सेवा देण्याचे आहे. एमजीकडून चालवल्या जाणाऱ्या सर्व सामाजिक उपक्रमांमध्ये वंचित मुलींचे शिक्षण, वृद्ध व्यक्तींच्या गाड्यांचे सॅनिटायझेशन, आर्थिकदृष्ट्या वंचित महिलांसाठी रोजगारनिर्मिती, स्थानिक आरोग्यसेवा संस्थांना मदत अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे आणि त्या आतापर्यंत एमजी सेवाच्या बॅनरखाली चालवल्या जात आहेत. या उपक्रमाची सुरूवात झाल्यापासून आतापर्यंत ६०,००० पेक्षा अधिक विद्यार्थिनींना शिक्षण घेण्यासाठी मदत करता आली आहे. 


      एमजी सेवाअंतर्गत इतर उपक्रमांमध्ये बेरोजगार महिलांना मास्क बनवण्यासाठी कौशल्यपूर्ण करणे, गुरगावमध्ये १०० शिक्षक आणि ४ लाखांपेक्षा अधिक मुलांना रस्तासुरक्षेबाबत शिक्षित करणे आणि ४,००० पोलिस गाड्यांचे सॅनिटायझेशन हे आहेत. हा कंपनीकडून आलेला एक वेगळा भाग आहे आणि त्यासाठी नेमलेल्या विशेष टीमकडून विविध प्रकारच्या नावीन्यपूर्ण कल्पना येतात आणि त्यावर अंमल केला जातो.

Post a Comment

0 Comments