जन्म-मृत्यूचे रजिस्टर्ड जीर्ण अवस्थेत न्यायालयाच्या आदेशानेच जुने जन्म मृत्यू दाखले मिळणार!


कल्याण :   कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील मुख्यालयात असणाऱ्या जुन्या इमारतीत जन्म मृत्यू नोंद विभागाच्या कार्यालयात साठ-सत्तर वर्षापूर्वीचे नोंदणीची पुस्तिका (रजिस्टर्ड) जीर्ण अवस्थेत झाल्याने भविष्यात दाखले मिळण्यात तारेवरची कसरत नागरिकांना करावी लागणार असून रेकॉर्ड न मिळाल्यास न्यायालयाच्या प्रोसेस पूर्ण केल्यानंतरच दाखले देणार असल्याचे  साथरोग अधिकारी व उपनिबंधक जन्ममृत्यू विभाग डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी सांगितले आहे.कल्याण नगर परिषद असल्यापासून जन्म-मृत्यूची नोंद या जुन्या इमारतीमधील कार्यालयात नोंदणीचे पुस्तिका उपलब्ध असून साठ-सत्तर वर्षांपूर्वी चा जन्म मृत्यूची नोंद केलेला कागद जीर्ण झाला आहे. १९७५ चे रेकॉर्ड बुक हात लागताच फाटत असल्याने रेकॉर्ड मिळणे मुश्कील होऊन बसणार आहे. जन्म-मृत्यूचे महत्त्वाचे रेकॉर्ड असलेल्या या इमारतीला पावसाळ्यात गळती लागल्याने अनेक नोंदणी केलेले रजिस्टर  खराब स्थितीत पडून आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत १९९५ पासून ठेवलेले संगणकीय जन्म-मृत्यू नोंदणी सुरुवात झाली असून भविष्यात जीर्ण झालेले जुने रेकॉर्ड संबंधितांना मिळण्याकरिता न्यायालयाच्या आदेशाकडून मिळणार आहे.जन्म-मृत्यू विभागाकडे संबंधितांनी अर्ज केल्यास त्यांचे रेकॉर्ड असेल त्यांना सर्टीफिकीट आम्ही देत असून त्यांचे रेकॉर्ड दप्तरी आढळून आल्यास त्यांना एन एस सी (नॉन अबिलिटी सर्टिफिकेट) देतो. पण या करिता आमच्याकडे सर्टीफिकीटची मागणी करणाऱ्यांकडून सदर व्यक्तीचा जन्म केव्हा मृत्यू पालिका हद्दीत झालेला असावा अशांनाच आम्ही एनएससी देतो ते न्यायालयाकडे घेऊन जावे लागत असून न्यायालयाने याबाबत ऑर्डर देऊन नोंद करण्याचे आदेश देते. यानंतर आम्ही जन्म-मृत्यूचे दाखले संबंधितांना देत असल्याची माहिती कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी तथा उपनिबंधक जन्ममृत्यू विभागाच्या प्रमुख डॉक्टर प्रतिभा पानपाटील यांनी दिली आहे.


 

जीर्ण होत चाललेले जन्म-मृत्यूची पुस्तिका योग्य ते केमिकल वापरून या कामात जादा कर्मचारी वाढवून फाटत चाललेले रेकॉर्ड संगणक प्रणालीत नोंद करून ठेवण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते बाबा रामटेके यांनी केली आहे. या जीर्ण झालेल्या पुस्तिकेला पाणीबुरशीउदी लागणार नाही याची काळजी घेण्याचे ही त्यांना सांगितले आहे.

Post a Comment

0 Comments