नवाब मलिक यांच्या अटकेनंतर कल्याणात राष्ट्रवादीची निदर्शनेकल्याण : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीकडून झालेल्या अटकेचे पडसाद आज कल्याणातही पाहायला मिळते. कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे बुधवारी निदर्शने करण्यात आले. 


     राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांची बुधवारी ईडीकडून चौकशी सुरू झाली. नवाब मलिक सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास ईडीच्या कार्यालयात अधिकाऱ्यांसह दाखल झाले. ८ तासाच्या चौकशीअंती त्यांना ईडीकडून अटक करण्यात आले असल्याचे समोर आल्यानंतर राजकारणात एकच खळबळ उडाली. याचे पडसाद मुंबईसह कल्याणात देखील पाहायला मिळाली आहे. 


     राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकत्र येऊन निषेध केला. तसेच भाजपकडून महाराष्ट्रातील सरकार अस्थिर करण्यासह महाविकास आघाडीतील नेत्यांची भाजपकडून नाहक बदनामी सुरू असल्याची प्रतिक्रिया महेश तपासे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments