३२०० मोटर सायकलची माहिती मिळवल्यावर तो विकृत तरुण पोलिसांच्या जाळ्यात....


डोंबिवली ( शंकर जाधव )   एका विकृत तरुणाला डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी सीसीटीव्हीच्या सहाय्याने अटक केली आहे. या तरुणाने एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला होता.आरोपीला शोधण्यासाठी  ३२०० मोटरसायकलीचा शोध घेतला.


           मिळालेल्या माहिती नुसार,अमन यादव असे अटक केलेल्या विकृत तरुणाचे नाव आहे.डोंबिवलीच्या एका हाय प्रोफाईल परिसरात  एक लहान मुलगी आपल्या इमारतीच्या जिन्यातून खाली उतरत असताना तिला एका तरुणाने स्पर्श केला. घाबरलेल्या  मुलीने हा प्रकार तिच्या घरच्या मंडळींना सांगितला.   तरुणाला पकडण्यासाठी घरच्यांनी त्याचा शोध सुरू केला. मात्र इसम पसार झाला होता. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. आरोपीने  टोपी घातल्याने तो स्पष्ट दिसून येत नव्हता. 


        हे प्रकरण मानपाडा पोलिस ठाण्यात पोहचले. सहायक पोलिस आयुक्त जयराम  मोरे आणि वपोनि शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी अविनाश वनवे यांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. पोलिसांनी परिसरातील सर्व सीसीटीव्ही कॅमेरे तपासले.  एके ठिकाणी तोच तरुण काही खेळणाऱ्या  मुलांना लक्ष्य करण्यासाठी आला असता त्याची ब्लॅक कलरची युनीकॉन बाईक सीसीटीव्हीत कैद झाली होती. अविनाश वनवे यांच्या पथकाने माहिती काढली की, डोंबिवलीत किती जणांकडे युनीकॉन बाईक आहेत. 


        पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे चौकशी केली असता दहा हजार वाहनचालकांकडे  अशा प्रकारची मोटरसायकल  असल्याची नोंद असल्याची माहिती मिळाली. त्यामध्ये ब्लॅक कलरची बाईक ३२०० वाहनचालकांकडे असल्याची माहिती समोर आली. 


        यापैकी  सोनारपाडा परिसरात ८० वाहनचालकांकडे अश्याप्रकारची मोटरसायकल  आहे. मात्र  ब्लॅक कलरच्या युनिकॉन इंडिकेटर तुटलेली  मोटरसायकल कोणत्या वाहकचालकांकडे आहे याचा तपास सुरू होता त्यापैकी एक मोटरसायकल पोलिसांनी शोधून काढली.


       ती मोटरसायकल अमन यादव नावाच्या वाहन चालकांकडे आहे. मानपाडाय पोलिसांनी चौकशीसाठी अमन यादव याला ताब्यात घेतले.  अमन  हा प्रयागराज विद्यापीठातील विद्यार्थी आहे. तो सध्या सोनारपाडा येथील आई वडिलांकडे आला आहे. दोन ठिकाणच्या सीसीटीव्हीत अमन कैद झाला होता.

Post a Comment

0 Comments