भिवंडी - ठाणे रोडवर टोल वसुली करणाऱ्या रस्त्याच्या दुरावस्था विरोधात वंचित बहुजन आघाडी चा धरणे आंदोलन


भिवंडी दि 28(प्रतिनिधी ) भिवंडी ठाणे कशेळी भिवंडी वडपे या या टोल वसुली करणाऱ्या राज्य मार्गाची वर्षोनुवर्षे दुरावस्था झालेली असतानाच त्याच ठिकाणी सध्या मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू असल्याने संपूर्ण रस्त्याची चाळण झालेले आहे. या विरोधात वेळोवेळी निवेदने देऊन आंदोलन करून सुद्धा सार्वजनिक बांधकाम विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याने पुन्हा एकदा वंचित बहुजन आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली कशेळी टोल नाका या ठिकाणी धरणे आंदोलन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे.


          टोल वसूल करणाऱ्या ठाणे भिवंडी रस्त्यावर किती ठिकाणी मोठ मोठाले खड्डे पडले असून त्यासोबतच रस्त्यालगतच्या गटारांची दुरुस्ती व स्वच्छता न केल्याने संपूर्ण रस्त्यावर पाणीच पाणी साचले जात असल्याने येथील स्थानिक नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे याविरोधात वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यानी रस्त्यांची दुरुस्ती तात्काळ करा अन्यथा टोल वसुली बंद करा अशा घोषणा देत निदर्शने केली जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शहराध्यक्ष बालाजी कांबळे यांसह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.


          या आंदोलना नंतर आंदोलकांनी आपल्या मागणीचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सह अभियंता स्नेहल कालभर यांना दिले असता त्यांनी लवकरच विभागाच्या माध्यमातून रस्ते दुरुस्ती करण्याचे काम सुरू करण्यात येईल असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments