कल्याण पूर्वेत कोंकण महोत्सवाला सुरवात कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे आयोजन


कल्याण : कल्याण पूर्वेतील पोटे मैदानात कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कोंकण महोत्सवाला सुरवात झाली असून ६ मार्च पर्यंत चालणाऱ्या भव्य दिव्य स्वरूपात कोंकण शुभारंभ कल्याण पूर्व विधानसभा मतदार संघाचे आमदार गणपत गायकवाड यांच्याहस्ते श्री गजाननाच्या पुजनाने कोंकणाच्या पारंपारीक पद्धतीने करण्यात आला. 


            यावेळी कोकण उत्कर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संजय मोरे, उपाध्यक्ष रमाकांत देवळेकर, सचिव संदीप तांबे, खजिनदार उत्तम पवार, उपसचिव संतोष गुरव, सल्लागार कैलास कालेकर, संतोष परब, दीपक गायकवाड, अजय पवार आदी पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या कोंकण महोत्सवात विविध प्रकारच्या कोंकणी खाद्य पदार्थांच्या मेजवानीसह प्रती दिन कोकणी संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविणारे मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर होणार आहेत. त्याच बरोबर या महोत्सवात  जत्रे प्रमाणेच आनंद लुटता येणार आहे. 


सलग १०  दिवस चालणार्‍या या अस्सल कोकणी महोत्सवात प्रती दिन सायंकाळी ६ नंतर कोंकणी परंपरा आणि कलेला चालना देणारे मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले  असून या महोत्सवा दरम्यान राजकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या नामांकीत व्यक्तीनाट्यटी .व्ही मालिका तसेच सिने कलाकारांनाही निमंत्रीत करण्यात आले आहे.


अस्सल कोंकणी परंपरेचा अनुभव घेण्यासाठी या महोत्सवास आवश्य भेट देण्याचे आवाहन कोकण उत्कर्ष प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संजय मोरे यांनी  केले आहे. 

Post a Comment

0 Comments