मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकांचा होणार कायापालट - खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश


ठाणे, प्रतिनिधी : - आज खासदार राजन विचारे यांनी मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकाचा पश्चिम रेल्वेचे मुख्य रेल्वे प्रबंधक जी व्ही एल सत्यकुमार, मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त दिलीप ढोले, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे, रेल्वे व महापालिकेच्या सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांच्या सोबत पाहणी दौरा आयोजित केला होता. या पाहणी दौऱ्या तत्पूर्वी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. 


        त्यामध्ये एम. आर. व्ही. सी. मार्फत पश्चिम रेल्वे मार्गावर मिरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकांचा होणाऱ्या विकास प्रकल्पाचे आज सादरीकरण करण्यात आले. त्यामध्ये या रेल्वे स्थानकांचे बोरवली रेल्वे स्थानकाच्या धर्तीवर डेक लेव्हल बनविण्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या मार्च महिन्यात याचे काम सुरू होणार आहे. 


       त्यामध्ये डेक लेव्हल वरती प्रवाशांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आसन व्यवस्था शौचालय फूड कोर्ट तसेच रेल्वे स्थानकात पादचारी पुल, सरकते जिने, लिफ्ट, सीसीटीव्ही इत्यादींचा समावेश असणार आहे. याचे काम दोन ते अडीच वर्षात पूर्ण करून देण्याचे आश्वासन रेल्वे प्रशासनाकडून दिले आहे. या कामांमध्ये दोन रेल्वे स्थानकांचा समावेश करून घेतल्याबद्दल रेल्वेमंत्री तसेच पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक व एम आर व्ही सी चेअरमन सर्वांचे आभार मानले आहे.


■खासदार राजन विचारे यांनी रेल्वे प्रवाशांच्या भेडसावणाऱ्या समस्या रेल्वे प्रबंधक यांच्या आणून दिल्या निदर्शनास


        खासदार राजन विचारे यांनी आज दोन्ही रेल्वे स्थानकात फेरीवाले, भिकारी, गर्दुल्ले यांचे साम्राज्य कमी करण्यासाठी महापालिका आयुक्त व रेल्वे प्रशासन तसेच स्थानिक रेल्वे पोलीस स्टेशन यांना आपल्या विभागाच्या हद्द ठरवून कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच रेल्वे स्थानकात बंद असलेल्या तिकीट खिडकी सुरू करून यांची संख्या वाढविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या रेल्वे स्थानकात अधिक फेऱ्या वाढविण्यासाठी लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळण्यासाठी पाचव्या व सहाव्या लाईनचे ही कामाची गती वाढविण्याच्या आदेश दिले आहेत. 


        तसेच भाईंदर रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेस फलाट क्रमांक १ च्या शेजारी असलेला रस्ता रुंदीकरण करून त्याची डागडुजी करून विद्युत पोल बसविण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. तसेच दोन्ही रेल्वे स्थानकात पाण्याची होणारी कमतरता व शुद्ध पाणी प्रवाशांना मिळत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तसेच मीरा रोड व भाईंदर रेल्वे स्थानकांचा समांतर रस्ता जोडण्यासाठी रेल्वे मार्फत अडचणी दूर केल्या.

Post a Comment

0 Comments