हरकतींवर योग्य निर्णय न झाल्यास कोर्टात जाणार - आमदार गणपत गायकवाड

■सत्ताधारी शिवसेनेने त्यांच्या सोयीनुसार प्रभाग रचना केल्याचा भाजप आमदारांचा आरोप..


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रभाग रचनेवर ९९७ हरकती दाखल झाल्या असून आज या हरकतींवर सचिव(अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमंत्रालयमुंबई) तथा प्राधिकृत अधिकारी विजय वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सुनावणी घेण्यात आली. 


         कल्याण पूर्वेचे आमादार यांनी ही प्रभाग रचनेच्या बाबत  हरकती  घेतल्या आहेत. दोन प्रभागातील नालेनद्या, रस्ते ओलांडून नकाशा प्रमाणे प्रभाग पाडले पाहिजेत मात्र तसे जर झालें नाही. या हरकतींवर निवडणूक आयोगाच्याअधिकाऱ्यांनी योग्य निर्णय न दिल्यास आपण कोर्टात जाऊ असा इशारा आमदार गणपत गायकवाड यांनी दिला आहे.


कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारीपासून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. एकूण ४४ पॅनलमध्ये १३३ प्रभागांची प्रभाग रचना होणार आहे. या प्रभाग रचनेच्या संदर्भात हरकती १४ फेब्रुवारी पर्यंत मागवल्या होत्या. त्यामुळे नागरिकांनी आणि नगरसेवकांनी एकूण ९९७ हरकती पालिकेला दिल्या. आज या हरकतींवर सुनावणी घेण्यात आली. त्यासाठी ३६ गट पाडण्यात आले होते. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी आधीही प्रभाग रचनेतील घोळ असल्याचा आरोप केला होता.


या प्रभाग रचनेत दिशानियमांचे उल्लंघन केले आहे. तसेच उल्हासनगरचा काही भागही केडीएमसीमध्ये दाखवण्यात आल्याचं गायकवाड यांनी म्हटले होते. आज महापालिका मुख्यालयात गायकवाड यांच्या हरकतींवर सुनावणी झाली. यावेळी भाजपचे कल्याण पूर्व मंडल अध्यक्ष संजय मोरेनगरसेवक अभिमन्यू गायकवाड, माजी परिवहन सभापती सुभाष म्हस्के, नितेश म्हात्रे हे देखील उपस्थित होते. आम्ही नोंदविलेल्या हरकतींची दखल घेतली नाही तर कोर्टात धाव घेणारअसा इशारा यावेळी गायकवाड यांनी दिला.

Post a Comment

0 Comments