भिवंडीत ह.भ.प. बळीराम पाटील यांचे निधन


भिवंडी  दि. १२ (प्रतिनिधी ) तालुक्यातील वळपाडा येथील वारकरी संप्रदायातील जैष्ठ हभप बळीराम दादाजी पाटील यांचे वायच्या ८६ व्या वर्ष अल्प आजाराने शुक्रवारी निधन झाले आहे. त्यांच्यावर गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. 


               यावेळी राजकीय , सामाजिक , शैक्षणिक तसेच वारकरी संप्रदायातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांची दशक्रिया विधी २० फेब्रुवारी रोजी काल्हेर येथील रेतीबंदर येथे होणार असून उत्तरकार्य २३ फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता राहत्या घरी कैलास नगर वळपाडा येथे होणार आहेत. 


            हभप बळीराम पाटील यांनी अनेक वर्षे वारकरी संप्रदायाची सेवा केल्याने ते तालुक्यात सर्वत्र परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले , दोन मुली , सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. भिवंडीतून प्रसिद्ध होणारे दै स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील यांचे ते वडील होते.

Post a Comment

0 Comments