खळबळ जनक ! हफ्ता मागणाऱ्या गुंडाचे चित्रकरण करणाऱ्या सेक्स वर्कर महिलेच्या पोटात खुपसला चाकू ; महिला गंभीर ..


भिवंडी दि 25 (प्रतिनिधी ) : वेश्या वस्तीत घुसुन एका सेक्स वर्कर महिलेकडे हफ्ता मागणाऱ्या सराईत गुंडांचे मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीकरण करणाऱ्या त्या सेक्स वर्कर महिलेच्या पोटात धारदार चाकू भोसकून तिला गंभीर जखमी केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.


          हि घटना भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथील वेश्या वस्तीत घडली आहे. याप्रकरणी भिवंडी शहर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून दोन सराईत गुंडाना अटक केली आहे. मुजाहीद रहनुउद्दीन शेख (वय, २९ रा. मक्का मजीद शेजारी भिवंडी ) अरबाज जावेद शेख (वय २४, रा. रावजीनगर, भिवंडी) असे अटक केलेल्या सराईत गुंडांचे नाव आहेत,  तर तिसरा आरोपी अल्पवयीन असून तो फरार आहे. 

 

■जमिनीवर आपटून महिलेच्या पोटात खुपसला चाकू .. 


        ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी वेश्या वस्ती भिवंडीतील हनुमान टेकडी भागात आहे. या वस्तीत सेक्स वर्कर म्हणून कार्यरत असलेल्या महिलांना सतत गुंडांकडून नाहक त्रास दिला जात असल्याचे अनेकदा उघडकीस आले असतानाच   एका ४० वर्षीय सेक्स वर्कर महिलेकडून तडीपार असलेला गुंड मुजाहीद हा त्याच्या साथीदारासह काल रात्रीच्या सुमारास दिड हजार हफ्ता मागत होता.


         त्यावेळी त्या सेक्स वर्करने  हफ्ता देण्यास नकार दिल्याने गुंड मुजाहीद आणि त्याच्या साथीदाराने त्या महिलेला शिवीगाळ करत मारहाण सुरु केली. त्यामुळे ४५ वर्षीय सेक्स वर्कर महिला या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करीत असतानाच त्याला गुंड मुजाहीद आणि त्याच्या साथीदाराने  विरोध करत त्याही सेक्स वर्कर महिलेच्या डोक्याचे केस पकडून जमिनीवर आपटून  तिच्या पोटात धारदार चाकू खुपसून तिन्ही  हल्लेखोर पसार झाले. 

 

■हल्लेखोर तडीपार गुंड ; सोमवारपर्यत पोलीस कोठडी .. 


         दरम्यान गंभीर जखमी अवस्थेत पडलेल्या त्या सेक्स वर्कर महिलेला शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरु केला असता तीन हल्लेखोरापैकी दोघांना पोलिसांनी काल रात्रीच्या सुमारास अटक करून आज दोघांनाही न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.


          या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मुजाहीद हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याला काही महिन्यापूर्वीच तडीपार केले होते.  या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शरद पवार करत आहेत. 

Post a Comment

0 Comments