एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सने इलेक्ट्रिक स्कूटर 'जॉण्टी प्लस' लॉन्च केली

 

■सरासरी १२० किमीहून अधिक अंतराची रेंज; फक्त चार तासांमध्ये १०० टक्के चार्ज होते ~


मुंबई, ७ फेब्रुवारी २०२२ : एएमओ इलेक्ट्रिक बाइक्स या भारतातील झपाट्याने विकसित होणा-या इलेक्ट्रिक मोबिलिटी ब्रॅण्डने त्यांची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर/बाइक जॉण्टी प्लस लाँच केली आहे. हे सादरीकरण भारतामध्ये विश्वासार्ह, शाश्वत आणि परवड्याजोगे ई-मोबिलिटी सोल्यूशन्स देण्यामधील एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सच्या आणखी एका यशस्वी कामगिरीला सादर करते.


    एर्गोनॉमिक डिझाइन, स्टाइल व वैशिष्ट्यांच्या परिपूर्ण संयोजनासह डिझाइन करण्यात आलेल्या जॉण्टी प्लसमध्ये ६० व्होल्ट / ४० एएच प्रगत लिथियम बॅटरीची शक्ती आहे. ही बाइक अधिक अंतर कापते, ज्यामधून ग्राहकांना शहरी साहसी राइडचा आनंद घेण्यास प्रोत्साहन मिळते. या ई-बाइकमध्ये उच्च–कार्यक्षम मोटर, क्रूझ कंट्रोल स्विच, इलेक्ट्रॉनिक असिस्टेड ब्रेकिंग सिस्टिम (ईएबीएस), अॅण्टी-थेफ्ट अलार्म आणि प्रबळ चेसिससह सर्वोत्तम वैशिष्ट्ये आहेत. इतर वैशिष्ट्यांमध्ये टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन, उच्च ग्राऊण्ड क्लीअरन्स, साइड स्टॅण्ड सेन्सर, सेंट्रल लॉकिंग, फ्रण्ट डिस्क ब्रेक, डीआरएल लाइट्स आणि इंजिन किल स्विच आदींचा समावेश आहे.


       जॉण्टी प्लस सरासरी १२० किमीहून अधिक अंतराची रेंज देते. ब्रशलेस डीसी मोटरसह फास्ट चार्जिंग असलेली ही ई-बाइक अधिकतम ४ तासांमध्ये पूर्णपणे चार्ज होते. सुधारित सुरक्षितता व स्टाइलसह जॉण्टी प्लसमध्ये मोबाइल यूएसबी चार्जिंग पोर्ट देखील आहे. यामध्ये फिक्स्ड व पोर्टेबल बॅटरी पॅक पर्याय असेल.


    नवीनच लाँच करण्यात आलेली ई-बाइक तीन वर्षांच्या वॉरंटीसह येते आणि रेड-ब्लॅक, ग्रे-ब्लॅक, ब्ल्यू- ब्लॅक, व्हाइट-ब्लॅक व येलो-ब्लॅक या पाच आकर्षक रंगांच्या व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. स्टाइल, कार्यक्षमता व सुरक्षिततेचे परिपूर्ण संयोजन असणा-या या ई-बाइकची किंमत १,१०,४६०/- रूपये एक्स-शोरूम आहे.

 

 एएमओ इलेक्ट्रिक बाइक्सचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सुशांत कुमार म्हणाले, "आम्हाला भारतीय ऑटोमोटिव्ह बाजारपेठेमध्ये तंत्रज्ञानदृष्ट्या-प्रगत जॉण्टी प्लस सादर करण्याचा आनंद होत आहे. आमच्या इन-हाऊस संशोधन व विकास टीमने संकल्पना मांडण्यासोबत डिझाइन केलेल्या या पर्यावरणास अनुकूल बाइक्समधून दर्जात्मक ईव्ही मोबिलिटी सोल्यूशन्स व सेवा देण्याप्रती आमच्या ब्रॅण्डची कटिबद्धता दिसून येते. 


    स्टायलिश डिझाइन, डिजिटल डिस्प्ले, दर्जात्मक सुरक्षितता वैशिष्ट्ये आणि सानुकूल स्पीड व अधिकतम रेंजने युक्त जॉण्टी प्लस उच्चस्तरीय इलेक्ट्रिक बाइक्सचा शोध घेणा-या ग्राहकांसाठी परिपूर्ण पॅकेज आहे." ही बाइक १५ फेब्रुवारी २०२२ पासून १४० डिलरशिप्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल.

Post a Comment

0 Comments