ब्रह्मांड संगीत कट्टयाची ठाणे शहर शाखेची ठाणेनगरीत दणदणीत दमदार एंट्री.


ठाणे , प्रतिनिधी  : ठाण्यातील एकमेवाद्वितीय ब्रम्हांड कट्टा अंतर्गत ब्रम्हांड संगीत कट्ट्याच्या ठाणे शहर शाखेचे शुक्रवार दि 11/2/22 रोजी सायंकाळी मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखदार आणि अगदि झोकात उदघाटन झाले.


            ठाणे शहर उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम,  स्थानिक नगरसेवक सुनिल हंडोरे,  ठाणे कॉंग्रेस सचिव व इंटकचे अध्यक्ष सचिन शिंदे,  फायर ब्रिगेड ऑफिसर मोहीते साहेब व भिंवडी तालुका कॉंग्रेस अध्यक्ष सचिन नागावेकर या सर्व मान्यवरांची या देखण्या सोहळ्याला उपस्थिति लाभली. सर्वांनी या कट्ट्याच्या भरभराटीसाठी आणि  उत्कर्षासाठी मन:पुर्वक शुभेच्छा दिल्या. ठाणे स्टेशनजवळ ही शाखा झाल्यामुळे सर्व संगीतप्रेमींनी या शाखेचे अगदि मनापासून स्वागत केले आणि या शाखेला भरभरुन शुभेच्छा दिल्या.


         मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कट्ट्याचा शुभारंभ झाल्यानंतर कट्ट्याच्या गायकांनी हा पहिलावाहिला कट्टा अक्षरशः गाजवला. स्वरांची अखंड बरसात होत राहिली आणि या संगीत वर्षावात कट्टा चिंब न्हाऊन निघाला.


          हा उदघाटनचा कट्टा भारतरत्न, गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा श्रद्धांजलीपर कट्टा जाहिर करण्यात आला होता त्यामुळे दिदिंची एकाहून एक सुरेल सुमधूर गाणी गाऊन कट्ट्याच्या गायकांनी दिदिंना भावपुर्ण आदरांजली वाहिली.


          ए मेरे वतन के लोगों, अजीब दास्तां है ये, तू जहां जहां चलेगा, जाने क्यूं लोग मोहब्बत किया करते है, रहे ना रहे हम, अखेरचा हा तुला दंडवत अशी लता दिदिंची एकापेक्षा एक सुंदर सोलो गाणी तसेच किसी राहमे किसी मोड पर, ये रात भिगी भिगी, एक मै और एक तू, तेरे चेहरेसे नजर नही हटती, मै चली मै चली या सारखी सदाबहार डुएट्स गीतं कट्ट्याच्या गायकांनी अतिशय समरसून गायली. श्रोत्यांचा त्यांना भरभरुन उत्तम प्रतिसाद मिळाला.


           ब्रम्हांड कट्ट्याचे लोकप्रिय, तडफदार संस्थापक श्री राजेशजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. ब्रम्हांड संगीत कट्ट्याचे अध्यक्ष  श्री. अरुणजी दळवी यांनी या नव्या शाखेला शुभेच्छापूर्वक आशिर्वाद दिले. मान्यवरांच्या हस्ते नविन कमिटी सदस्य श्री मंगेश भोईर, सौ मनिषा ठाणेकर, सौ कविता सपकाळे, श्री संदीप गुप्ता, श्री जयंत घेगडमल आणि श्री आनंद खर्डीकर यांचा सत्कार करण्यात आला. 


         कट्ट्याच्या उत्कृष्ट  निवेदिका सौ. ऋजुता देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. शेवटी श्री. जयंत घेगडमल यांनी सर्वांचे आभार प्रकट केले आणि या देखण्या सोहळ्याची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments