अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले कनेक्टी व्हीटीसह येणार एमजी झेडएस ईव्ही २०२२

■१०.१ इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिमचाही असणार समावेश ~


मुंबई, १५ फेब्रुवारी २०२२ : एमजी मोटरच्या बहुप्रतिक्षित नवीन झेडएस ईव्ही २०२२ च्या नवीन अवतारामध्ये १०.१ इंच एचडी टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम आणि फर्स्‍ट-इन-सेगमेंट अँड्रॉईड व अॅप्पल कारप्ले कनेक्टीव्हीटी असणार आहे. नवीन झेडएस ईव्हीमध्ये एमजीचे जागतिक यू्.के. डिझाइन पैलू सामावलेले आहेत, ज्‍यामुळे सूक्ष्‍मदर्शी ग्राहकांना लेजर व कम्फर्ट आणि लक्झरी घटकांची सुधारित श्रेणी देण्‍यात आली आहे. आपल्या सीएएसई (कनेक्टेड, ऑटोनॉमस, शेअर्ड व इलेक्ट्रिक) दृष्टीकोनामधून संचालित अत्याधुनिक ऑटोमेकरने आज ऑटोमोबाइल विभागांतर्गत व्यापक अनुभवांमध्ये वाढ केली आहे.


       झेडएस ईव्ही सोबत एमजी ग्राहकांना ५-मार्गी चार्जिंग परिसंस्था देत आहे, ज्यामध्ये निवासस्थानी/ कार्यालयांमध्ये मोफत एसी फास्ट-चार्जर, पोर्टेबल इन-कार चार्जिंग केबल, डिलरशिप्समध्ये डीसी सुपरफास्ट चार्जिंग स्टेशन्स, २४x७ चार्ज-ऑन-दि-गो फॅसिलिटी (५ शहरांमध्ये) आणि सॅटेलाइट शहरे व टूरिस्ट हब्स येथे चार्जिंग स्टेशन्स यांचा समावेश आहे.


          झेडएस ईव्ही २०२२ मध्ये फ्रण्ट-कव्हर्ड ग्रिल आणि आता एमजी लोगोच्या डाव्या बाजूस ठेवण्यात आलेले चार्जिंग सॉकेट, सनरूफ व नवीन १७-इंच रिफ्रेश डिझाइन अलॉय व्हील्स आहेत. नवीन झेडएस ईव्ही अपडेटेड फ्रण्ट फेशिया, एलईडी हेडलॅम्‍प्‍स, डीआरएल, नवीन अलॉय व्हील डिझाइन, नवीन बंपर आणि नवीन टेल-लाइट डिझाइनसह येईल. ही कार प्रवाशांना रिअर-सीटिंग झोनमध्ये सर्वोत्तम दर्जाच्या आरामदायी प्रवासाची खात्री देते. यामध्ये रिअर सीट सेंटर आर्म-रेस्टसह कपहोल्डर्स व सेंटर हेड-रेस्ट आहे. नवीन झेडएस ईव्हीमध्ये मागील प्रवाशांना अधिक आरामदायी सुविधा देण्यासाठी रिअर एअर-कंडिशनिंग वेण्ट्स देखील असणार आहेत.


       एमजी मोटरने २०२० मध्ये झेडएस ईव्ही लाँच केली आणि ही कार भारतातील कोणत्याही ईव्हीच्या तुलनेत अधिक लांबचे अंतर कापण्याची खात्री देणारी इलेक्ट्रिक वेईकल विभागातील सर्वात व्यावहारिक ऑफरिंग आहे. एमजी मोटरने भारतामध्ये झेडएस ईव्हीची दोन यशस्वी वर्षे पूर्ण केली, जी देशातील स्थिर गतीशीलतेप्रती ब्रॅण्डच्या कटिबद्धतेची हॉलमार्क राहिली आहेत. दोन वर्षांमध्ये एमजीने जवळपास ४,००० झेडएस ईव्हींच्या विक्रीची विक्रमी नोंद केली आहे. एमजी विभागामध्ये २७ टक्के बाजारपेठ हिस्सा संपादित करत भारतातील दुसरी सर्वात मोठी ईव्ही उत्पादक कंपनी बनली आहे.


       एमजी मोटरने भारतामध्ये अनेक 'प्रथम वेईकल्स' सादर केल्या आहेत, जसे भारताची पहिली इंटरनेट एसयूव्ही – एमजी हेक्टर, भारताची पहिली प्युअर इलेक्ट्रिक इंटरनेट एसयूव्ही – एमजी झेडएस ईव्ही, भारताची पहिली ऑटोनॉमस (लेव्‍हल १) प्रिमिअम एसयूव्ही – एमजी ग्लॉस्टर आणि वैयक्तिक एआय असिस्टण्ट व ऑटोनॉमस (लेव्हल २) तंत्रज्ञान असलेली भारताची पहिली एसयूव्ही – एमजी अॅस्टर

Post a Comment

0 Comments