डोंबिवली ( शंकर जाधव ) मी खूप भाग्यवान आहे कि आज या संस्थेने घेतलेल्या मा. .कै.गुणवंत हणमंत नगरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ आंतरशालेय चित्रकला स्पर्धेत प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्याची संधी मिळाली.विद्यार्थ्यांनो खूप मोठे व्हा, आवडत्या क्षेत्रात नाव कमवा पण आपल्या शाळेला आणि डोंबिवली शहराला विसरू नका असा सल्ला अनंत नगरकर यांनी उपस्थिती बालचित्रकारांना दिला. आंतरशालेय चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरण सभारंभात ते बोलत होते.
राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर विष्णुनगर शाळेच्या प्रांगणात सालाबाद प्रमाणे आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे संपन्न झाली. कै.गुणवंत हणवंत नगरकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ स्पर्धा प्रायोजित केली होती. यावेळी प्रमुख पाहुणे नगरकर म्हणाले, अश्या प्रकारच्या स्पर्धा दरवर्षी संस्थेच्या माध्यमातून चालू राहणे आवश्यक आहे.माझ्याकडून संस्थेला आवश्यक मदत नक्की करू.स्पर्धेचे हे २० वे वर्ष आहे.या स्पर्धेत स्वामी विवेकानंद विद्यामंदिर २० शाखांमधील एकूण ५०० विद्यार्थी सहभागी झाले.
शिशुवर्ग ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी गट क्रमांक १ ते गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली होती. स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी कोषाध्यक्ष शिरीष फडके, संस्था कार्यकारिणी सदस्या माधवी कुलकर्णी आणि सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षकवर्ग उपस्थित होते .
आंतरशालेय चित्रकला स्पर्धेचे परीक्षण श्रवणी कुमठेकर, प्रतिक्षा साळगांवकर ,अनुजा ओक, अंतरा गायकवाड, यज्ञेश बागवे व गौरव कुलकर्णी यांनी केले. विशेष म्हणजे परीक्षक हे याचे शाळेतील माजीविद्यार्थी आहेत.
स्पर्धेचे परीक्षण करताना परीक्षकांनी रंगसंगती,प्रमाणबद्धता, लय, मांडणी, रंगाचा गडदपणा या निकषावर विजेत्यांची नावे जाहीर केली. बक्षीस सभारंभात प्रमुख पाहुणे म्हणून अनंत गुणवंत नगरकर आणि अनुपमा अनंत नगरकर उपस्थित होते. शाळेच्या प्रांगणात चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. संस्था कोषाध्यक्ष शिरीष फडके, संस्था कार्यकारि
कार्यक्रमाची प्रास्तविकता स्पर्धा प्रमुख माधुरी कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालनाची जबाबदारी सरो
0 Comments