भिवंडीत मुंबई नाशिक महामार्गावर वडपे येथे अपघातात 9 जण जखमी ,5 जण गंभीर

 


भिवंडी :दि.17 (आकाश गायकवाड  )  मुंबई नाशिक महामार्गावरील वडपे बायपास या ठिकाणी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास नियंत्रण सुटलेल्या कारची ठोकर लागल्याने रिक्षा व दुचाकी वरील एकूण नऊ जण जखमी झाले आहेत .त्यामधील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ठाणे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे तर 3 महिलांना भिवंडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे .


          पोलिसां कडून मिळालेल्या महिती नुसार सकाळी साडे नऊ वाजताच्या सुमारास कंटेनर व त्यांच्या पाठी मागे कार भरधाव मुंबई च्या दिशेने जात असताना अचानक पुढील कंटेनर ने डाव्या बाजूला वळण घेण्यास सुरुवात केल्याने मागील कार चालकाने ठोकर लागण्या पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी कार भरधाव डाव्या बाजूने पुढे नेण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट रस्ता दुभाजका वरून जाऊन मुंबई कडून नाशिक च्या दिशेने जाणाऱ्या रिक्षा व दुचाकीवर आदळली.


          या अपघाता तगीता  चौधरी, दिव्या चौधरी ,संतोषी कोकेरा सर्व रा.कोलीवली ता. भिवंडी तबरेज अन्सारी ,सरंत गडग,अक्षय लहांगे,नियाजुद्दीन अन्सारी,साजिद अली,आलम अन्सारी असे रिक्षा मधील सात जण व दुचाकी वरील दोन जण असे एकूण 9 जण जखमी झाले .या मध्ये गोदामात कामाला जाणाऱ्या तीन महिलांचा समावेश आहे . या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अपघात गुन्ह्याची नोंद केली गेली आहे.

Post a Comment

0 Comments