भिवंडी महानगरपालिका 822 कोटी 43 लाख 32 हजार रकमेचा अंदाज पत्रक स्थायी समितीस सादर

         


भिवंडी दि 22 (प्रतिनिधी ) महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त सुधाकर देशमुख यांनी सन 2021 - 22 चे 820 कोटी 32 लाख 87 हजार रुपयाचे सुधारित अंदाजपत्रका सह सन 2022-23 या आर्थिक वर्षाकरिता 12 लाख 42 हजार शिल्लक दर्शवणारे 822 कोटी 43 लाख 32 हजार रकमेचे मूळ अंदाजपत्रक स्थायी समिती सभापती संजय म्हात्रे यांना अंतिम मंजुरीसाठी मंगळवारी सादर केला.


           या आर्थिक वर्षात 100 एमएलडी पाणी पुरवठा योजना,रस्ते बळकटीकरण,मनपाचे बाई गुलाबबाई पेटिट रुग्णालय सुरु करणे,केंद्राच्या निधीतून चार नागरी आरोग्य केंद्र पूर्ण करणे या कामांना प्राधान्य देण्यात आले असून शहरातील वऱ्हाळदेवी तलाव येथील जुन्या शहरासाठी जो दोन एमएलडी पाणी पुरवठा होत होता त्या ऐवजी आता पाच एमएलडी होणार आहे त्याच बरोबर शहरातील नागरिकांना 135 लिटर प्रति कुटुंब पाणीपुरवठा नियमित करण्याचा प्रयत्न मनपा करणार आहे . 


       शहरातील एकमेव स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनास तत्वतः मान्यता 10 कोटी रुपयांच्या निधी उपलब्ध होताच दुरुस्ती कामास देखील गती येणार आहे. पुढील मनपा निवडणुका लक्षात घेता करांमध्ये वाढ नाही आयुक्तांनी स्पष्ट केले. 

Post a Comment

0 Comments