भिवंडीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या शुभहस्ते तब्बल 81 कामांचा लोकार्पण व भूमिपूजन संपन्न

 


भिवंडी दि 14  (प्रतिनिधी )  केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री  कपिल पाटील यांच्या भिवंडी तालुक्यातील हायवे दिवे या गावासह  पंचक्रोशीतील अंजुर अलीमघर ,वेहळे, पिंपळनेर, सुरई या गावात जिल्हापरिषद सदस्य देवेश पाटील यांच्या पुढाकाराने मंजूर झालेल्या विविध विकासकामांसह कपिल पाटील फाऊंडेशन व डी मार्ट ई लर्निंग सेंटर च्या माध्यमातून तब्बल पाच जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू करण्यात आलेल्या ई क्लास रुम, वाचनालय ,ई लायब्ररी यांचा शुभारंभ केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री  कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.


             तर गावातील रस्ते ,गटार पाथवेज पथदिवे सुशोभी करण अशा विविध कामांचा भूमिपूजन सुद्धा केंद्रीय मंत्री  कपिल पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले  .ग्रामपंचायत हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे मूळ असून या ग्रामपंचायत क्षेत्रात अनेक काम थेट केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून होत असतात परंतु त्याचे श्रेय कधीच केंद्र सरकारला दिले जात नाही.


         14 व्या व 15 व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून देशातील 2 लाख 69 हजार ग्रामपंचायती मध्ये काम करण्यासाठी केंद्र सरकारच्या पंचायतराज मंत्रालयाच्या माध्यमातून 2 लाख 36 हजार कोटी निधी खर्च होणार असल्याने भविष्यात देशातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये एकाच वेळी कामाचा शुभारंभ ऑनलाईन च्या माध्यमातून देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते घडवून आणणार असून प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पाटीवर प्रधानमंत्री यांचे नाव झळकविण्याचा मनोदय केंद्रीय मंत्री  कपिल पाटील यांनी बोलून दाखविला आहे .

Post a Comment

0 Comments