एक्स रे काढण्याच्या बहाण्याने वॉर्डबॉयने केला 75 वर्षीय महिलेचा विनयभंग वॉर्डबॉय गजाआड


डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असताना एका 75 वर्षीय महिलेचा एक्स रे काढण्याच्या बहाण्याने रुग्णालयातील  
वॉर्डबॉयने विनयभंग केल्याची घटना सोमवारी घडली.या प्रकरणी डोंबिवली रामनगर पोलिसांनी वॉर्डबॉयला अटक करून गजाआड केले आहे.

 
        पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कानदास  वैष्णव असे अटक केलेल्या वॉर्डबॉयचे नाव आहे. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात कानदास हा गेल्या एक  वर्षापासून वॉर्डबॉयचे काम करत आहे.याच रुग्णलयात 75 वर्षीय महिला उपचारासाठी दाखल झाली  होती. उपचारादरम्यान  महिलेसोबत कानदासने १६ ते १९ फेब्रुवारी  दरम्यान  दाेनदा विनयभंग केला.  वयोवृद्ध महिला एक्स-रे करण्यासाठी रूममध्ये गेली असता कानदासने  महिलेचा विनयभंग केला होता. 


       याआधी  चुकून हा प्रकार झाला असेल असे महिलेला वाटले होते. मात्र पुन्हा तोच प्रकार घडल्याने वयोवृद्ध महिलेने घडलेला प्रकार मुलीला सांगितला.संतापलेल्या मुलीने  वॉर्डबॉयविरोधात डोंबिवली रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी केशव हसगूले यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला. कानदासला पोलिसांनी अटक केली आहे.

Post a Comment

0 Comments