राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त भिवंडीत 250 दुचाकींना मोफत पेट्रोल...


भिवंडी :दि.17 (प्रतिनिधी )  देशात पेट्रोल चे भाव शंभरी पार गेले परंतु सर्वसामान्यांचे उत्पन्नां मध्ये वाढ न झाल्याने सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडले आहे .त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भिवंडीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रवीण पाटील यांनी कल्याणनाका येथील सुंदरबेनी पेट्रोलपंप येथे मोफत पेट्रोल वितरण करून वाढदिवस साजरा केला आहे.


          प्रवीण पाटील यांसह युवक अध्यक्ष आसिफ खान, नामदेव आहेर, गायसुद्दीन अन्सारी यांसह असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात तब्बल 250 दुचाकी स्वारांना प्रत्येकी 100 रुपयांचे पेट्रोल वितरण करण्यात आले.या उपक्रमा मुळे मोफत पेट्रोल मिळण्याने दुचाकीस्वार सुखावले होते.

Post a Comment

0 Comments