जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनी महापालिकेतर्फे अभिवादन


कल्याण :-   जिजाऊ माँ साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात  काल त्यांच्या प्रतिमेस महापालिका सचिव  संजय जाधव यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या समयी उपस्थित कार्यकारी अभियंता राजीव पाठक, उप अभियंता जितेंद्र शिंदे तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी  वर्ग यांनी देखील त्यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करुन अभिवादन केले. 

            तद्नंतर पारनाका, कल्याण पश्चिम येथील असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास महापालिका सचिव संजय जाधव व सहा.जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


           डोंबिवली येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालया जवळील  स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास,विभागीय उपआयुक्त पल्लवी भागवत ,  यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी डोंबिवली विभागीय कार्यालयातील  इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments