भीषण आगीत कल्याण पूर्वेत बँकेचे एटीएम जळून खाक

 


कल्याण, कुणाल म्हात्रे  : कल्याण पूर्वेत आज सकाळी आगीच्या घटनेने खळबळ उडवून दिली. येथील कैलाश नगर आंबेडकर चौकात असणाऱ्या बँकेच्या एटीएमला आग लागली. ही आग इतकी मोठी होती की अवघ्या काही मिनिटात हे संपुर्ण एटीएम आगीच्या भक्ष्यस्थानी पडले.


ऍक्सीस बँकेचे हे एटीएम असल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. मात्र तोपर्यंत संपूर्ण एटीएम जळून खाक झाले होते अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली आणि एटीएममध्ये किती रोकड होती याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

Post a Comment

0 Comments