गणाईचा माताउत्सव २०२२ कार्यक्रम उत्साहात संपन्न मराठी भारतीच्या माताउत्सव कार्यक्रमाला महिलांचा उत्साह लक्षणीय


कल्याण : मराठी भारती संघटनेच्या माध्यमातून क्रांती ज्योती सावित्रीमाई फुलेफातिमा शेख आणि राजमाता जिजाऊ यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त "माताउत्सव २०२२" हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात विरार येथे पार पाडण्यात आला. माताउत्सव कार्यक्रमाच्या निमित्ताने अनेक महिलांसाठी सन्मानाचे हळदी कुंकू समारंभ म्हणजे यामध्ये फक्त सुवासिनी महिलांचा समावेश न करता अनेक विधवा महिलांना ही सन्मान करण्यात आला.


 सोबतच ज्या महिला अत्यंत कष्ट सहन करून आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत, त्यांना करियरसाठी प्रोत्साहन देत आहेत अश्या महिलांना पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार संघटनेच्या राज्यध्यक्षा ऍड. पूजा बडेकरकार्याध्यक्षा विजेता भोनकरउपाध्यक्ष आशिष गायकवाडकार्यवाह अनिल हाटे आणि संघटक राकेश सुतार ह्यांच्या हस्ते करण्यात आल्याचे पालघर अध्यक्ष सचिन सुतार ह्यांनी सांगितले.


        गणाई सांस्कृतिक पुनरुत्थान चळवळीच्या माध्यमातून सुरू झालेला "माताउत्सव२०२२" हा कार्यक्रम महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात साजरा करण्यात आला. सावित्रीबाई जयंतीच्या निमित्ताने ह्या मोहिमेला सुरुवात करण्यात आली. विदयार्थी भारती संघटनेकडून अनेक कॉलेज मध्ये हा उत्सव साजरा करण्यात आला. तसेच गणाईच्या अंतर्गत वाईकल्याणमाणगावमुंबईपालघररायगडसातारापुणेभोर या तालुका व जिल्हा पातळीवर हा कार्यक्रम साजरा करण्यात आला असल्याची माहिती गणाई आचार्य ज्योती निकाळजे यांनी दिली आहे. 


        मोहिमेचा शेवट वाघिणी संघटनेच्या कष्टकरी आणि लढवय्या महिलांना वाघिणी पुरस्कार देऊन कुलाबा फोर्ट येथे वाघिणी संघटेनेच्या अध्यक्ष ज्योती बडेकर ह्यांच्या हस्ते करण्यात आला.

Post a Comment

0 Comments