क्रीडा क्षेत्रासाठी कडक निर्बंधां बाबत लवकरच निर्णय घेऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार


कल्याण : महाराष्ट्र शासनाने कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता राज्यात कडक निर्बंध लागू केले असून यामध्ये मैदाने आणि इतर क्रीडा प्रकारचाही समावेश करण्यात आला आहे. गेले चार-पाच दिवस राज्यातील क्रीडा क्षेत्रामधून  कडक निर्बंध शिथिल करण्यात यावे यासाठी खेळाडू प्रशिक्षक पालक यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे सचिव नामदेव शिरगावकर यांना हजारो मेल आणि निवेदन देण्यात आली होती.


याबाबत महाराष्ट्र ओलंपिक कार्यकारी पदाधिकारी यांची बैठक संपन्न झाली. या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिकचे अध्यक्ष अजित पवार हेही उपस्थित होते. त्यांना  सचिव नामदेव शिरगावकर यांनी  भेट घेऊन राज्यातील क्रीडा क्षेत्रातील सध्याची परिस्थिती आणि  निवेदन याबाबत सांगितले. यावेळी अजित पवार यांनी येणाऱ्या काळा मध्ये राज्याचा टास्क फोर्स यांच्याशी विचार विनिमय करून  लवकरच क्रीडा क्षेत्राच्या हिताचा निर्णय घेऊ तसेच राज्यातील खेळाडू आणि प्रशिक्षक यांनी निराश न होता जसा जोश आहे तसाच ठेवावा येणाऱ्या काळामध्ये लवकरच क्रीडा क्षेत्र खुले केले जाईल.. 


राज्याची सध्याची परिस्थिती पाहता सर्व शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी बंद असल्यामुळे सध्या तरी हा निर्णय आत्ता घेता येणार नाही परंतु लवकरात लवकर निर्णय घेऊन क्रीडाक्षेत्राचा विचार केला जाईल असे आश्वासन अजित पवार यांनी दिले असल्याची माहिती क्रीडा शिक्षक अविनाश ओंबासे यांनी दिली.

Post a Comment

0 Comments