सुरक्षा विभागाच्या रक्तदान शिबिरात ८० युनिट रक्त संकलित


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका सुरक्षा विभाग आणि ट्रायम्फ ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उपक्रमा अंतर्गत सावित्रीबाई फुले जयंतीचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात करण्यात आले होते. यामध्ये ८० युनिट रक्त संकलित करण्यात आले.


       महापालिकेची सुरक्षा करण्यासाठी नेहमी तत्पर असलेल्या पालिकेच्या सुरक्षा विभागाच्या वतीने नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढाकार घेत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. आज सावित्रीबाई फुले जयंती असल्याने महिला सुरक्षा रक्षक सरिता चरेगावकर यांनी रक्तदान करत या रक्तदान शिबिराला सुरवात करण्यात आली.


        यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनिल पवार, मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुक्त बाळासाहेब चव्हाण, पल्लवी भागवत, अर्चना दिवे, विनय कुलकर्णी, अनंत कदम, महापालिका सचिव संजय जाधव, सहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे, मुख्य सुरक्षा अधिकारी भरत बुळे आदी अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. हे रक्तदान शिबीर यशस्वी करण्यासाठी गणेश सावकारे, श्रीकांत गर्गे, विश्वास डोमाडे, वैभव चौधरी, श्रीकांत भांगरे यांच्यासह सर्व सुरक्षा रक्षकांनी विशेष मेहनत घेतली.

Post a Comment

0 Comments