विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पतंगीतून 'कोरोना गो बॅक' संदेश

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) करोच्या तिसऱ्या लाटेत शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यानी बनवलेल्या पतंगीतुन 'कोरोना गो बॅक' संदेश दिला आहे.कल्याण मधील नूतन विद्यालयातील दहावीतील विद्यार्थ्यांनी मकर संक्रातीनिमित्त 15 बाय 18 फुटाचा भव्य पतंग बनवला आहे.


       पतंग बनविण्यासाठी  कला शिक्षक श्रीहरी पावळे यांनी विद्यार्थ्यांना मदत केली. कोरोना काळात शाळा बंद होत्या. शाळा बंद असल्या प्रत्यक्ष शिक्षणात आणि ऑनलाईन शिक्षणात फरक असतो. शाळेतील दहावीच्या विद्यार्थ्यांना घेऊन हा पतंग तयार केला आहे. 


       इंग्रजाच्या विरोधात स्वातंत्र्याचा लढा देत असताना 1927 साली सायमन गो बॅक करण्यासाठी अशा प्रकारचा भव्य पतंग तयार करण्यात आला होता. त्याच धर्तीवर 2022 मध्ये कोरोना गो बॅक करण्यासाठी हा पतंग तयार करण्यात आल्याचे शिक्षक पावळे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments