खलबत्याने ठेचून पोलिस कॉन्स्टेबलची हत्या पत्नी आणि मुलीला अटकडोंबिवली ( शंकर जाधव )  मुंबईतील कुर्ला पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलची घरगुती वादातून हत्या झाल्याची घटना गुरुवारी कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी  पावशेनगर परिसरात घडली.हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नी व मुलीला कोळसेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.


         मिळालेल्या  माहितीनुसार, पत्नी ज्योती बोरसे आणि मुलगी भाग्यश्री बोरसे अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.तर यात मयत पोलीस  कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे असे नाव आहे.प्रकाश बोरसे याची घरगुती वादातून पत्नी आणि मुलीने घरातील खलबत्याने ठेचून हत्या केली.  
    कुर्ला पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश बोरसे कल्याण पूर्वेकडील कोळसेवाडी पावशे नगर परिसरात  पत्नी ज्योती बोरसे व मुलगी भाग्यश्री बोरसे यांच्याबरोबर राहत होते. 


         तीन वर्षापूर्वी मुलगी भाग्यश्री हिचा विवाह झाला होता. ती पतीबरोबर नांदत नसल्याने प्रकाश आणि त्यांच्या पत्नी ज्योती व मुलगी भाग्यश्री यांच्यामध्ये सतत वाद होत होते. गुरुवारी  रात्री त्यांच्यात वाद झाल्यावर संतापलेल्या पत्नी आणि मुलीने  त्याच्या डोक्यात खलबता मारत डोके  ठेचून त्यांची हत्या केली.

Post a Comment

0 Comments