टीजेएसबी बँकेतील खाते धारक शिक्षक - शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अपघाती ३५ लाखाचे विमा कवच

■भाजपा शिक्षक आघाडीची मागणी कार्यकारी अधिकारी यांनी केली मान्य..


कल्याण : भाजपा शिक्षक आघाडी यांची टीजेएसबी बँकेचे कार्यकारी अधिकारी यांच्यासोबत नुकतीच बैठक पार पडली.  यावेळी पगार खातेधारक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना दिला जाणारे अपघाती विमा कवच मागील वर्षी बँकेने मोफत दिले होते. त्यामुळे त्याचे हप्ते मागील वर्षी बँकेनेच भरले होते.  याही वर्षी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वर्गाकरीता टीजेएसबी बँकेतर्फे मोफत अपघाती विमा दिला जाणार आहे.  अपघातात मृत्यू झालेल्या सदर कर्मचाऱ्यांना रूपये 35 लाख विम्याची रक्कम दिली जाईल. 


तसेच अडचणीच्या वेळी घेता येणारी ओहरड्राफ्ट योजना यातून मागील वर्षी दोन पगार इतकी रक्कम दिली जात होती. यावर्षी ही रक्कम वाढवून तीन पगार एवढी देण्यात यावी असे शिक्षक आघाडीच्या वतीने सांगण्यात आले होते. त्यालाही सकारात्मक प्रतिसाद देत या वर्षापासून कर्मचाऱ्याला तीन पगार ओव्हरड्राफ्ट अडचणी च्या वेळी घेता येणार आहे असे बॅकेचे कार्यकारी अधिकारी सुनील साठे यांनी सांगितले. स्वर्गीय सुंदरलाल मराठे यांना अपघाती विम्याचे पैसे मिळावे यासाठी निवेदन साठे यांना कोकण विभाग शिक्षक आघाडीचे सहसंयोजक दिनेश भामरे व कल्याण जिल्हा आघाडीचे सहसंयोजक ज्ञानेश्वर घुगे यांनी दिले. 


            सोबतच आता खातेधारक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना एटीएम कार्ड चार्जेसएटीएम ट्रांजेक्शन चार्जेससीकेवायसीआर सर्विस चार्जेसई पॅन व्हेरिफिकेशन चार्जेसबी बी एस चार्जेसअकाउंट किपिंग चार्जेसकमिशन ऑन पे स्लिपएसएमएस अलर्ट चार्जेसकमिशन ओन डिमांड ड्राफ्ट फोलिओ चार्जेसकमिशन ऑन चलनएटीएम मेंटेनन्स चार्जेसडुबलीकेट पासबुक चार्जेसईसीएस मॅग्नेट व्हेरिफिकेशन चार्जेसअकाउंट स्टेटमेंट चार्जेस,  स्टॉप पेमेंट चार्जेसऑर्डर कॅन्सलेशन चार्जेसमिनिमम बॅलन्स चार्जेसकार्ड चार्जेसआय एम पी एस चार्जेस चार्जेसएन एफ एस चार्जेस,  डुबलीकेट पिन चार्जेस,  कार्ड मेन्टेनन्स चार्जेसआर टी जी एस आणि एन ई एफ टी चार्जेसदर बँक एटीएम चार्जेसचेक बुक चार्जेसएसएमएस बँकिंग चार्जेस हे यापुढे खातेधारक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांना लागणार नाहीत.


बँकेच्या वतीने या सुविधा शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना देण्यात आले असल्याचे बँकेच्या वतीने सांगण्यात आले. बँकेच्या या निर्णयाचे भाजपा शिक्षक आघाडी कोकण विभागाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. अशी माहिती प्रदेश सहसंयोजक विकास पाटीलकोकण विभाग संयोजक एन एम भामरे कोकण विभाग कार्यवाह विनोद शेलकर यांनी दिली.

Post a Comment

0 Comments