कल्याण मध्ये गटार गेले वर, इमारती राहिल्या खाली पावसाळ्यात उद्भवणार पाणी तुंबण्याची समस्या एमएसआरडीसी चा कारनामा


कल्याण : भिवंडीतील रांजनोली ते शिळफाटा  या कल्याण शिळ रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम एमएसआरडीसीच्या माध्यमातून सुरु आहे. याच कामाअंतर्गत शहरात गटाराचे काम सुरू असून या गटारांची उंची तब्बल तीन ते चार फूट उंच असल्याने रस्त्यांवरील इमारतीदुकाने फुटपाथ वरती व दुकाने खाली अशा परिस्थिती मध्ये दिसत आहे. 


          यामुळे येत्या पावसाळ्यात दुकानांमध्ये व इमारतींमध्ये पाणी शिरण्याची शक्यता निर्माण झाली असून. फुटपाथ उंचीचे काम सुरू असतानाच या उंचीमुळे अनेक अपघातही घडले असा आरोप येथील दुकानदारांनी केला आहे. या फूटपाठाचे काम नियोजन पद्धतीने करावे जेणेकरून व्यापाऱ्यांचे नुकसान आणि अपघात टाळण्यास मदत होईल अशी अपेक्षा स्थानिक व्यापारी वर्गाने व्यक्त केली आहे.


एमएसआरडीसीकडून कल्याणमध्ये गटर आणि फूटपाथचे काम सुरु आहे. आग्रा रोडवर हे काम सुरू आहे. मात्र या कामामुळे व्यापारी आणि नागरिक हैराण झाले आहेत. गटारे आणि त्यांच्यावर बांधण्यात येणारे फूटपाथ त्यामुळे ही गटारे उंच झाली आहेत. त्या मुळे रस्ता खाली गेला आहे. 


इतकेच नव्हे तर रस्त्याच्या बाजूला असलेली दुकानेसोसायट्या आणि चाळी खाली गेल्या आहेत. पावसाळ्यात चाळीदुकाने आणि सोसायट्यांमध्ये पाणी शिरणार असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी एमएसआरडीसीला वारंवार तक्रार करुन देखील कोणताही प्रतिसाद मिळाले नाहीअशी प्रतिक्रिया राकेश मुथा यांनी दिली.


दरम्यान याबाबत एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले कीसंदर्भीत परिसरात पावसाळ्यात दुकानमध्ये पाणी शिरणार नाही याबाबत दक्षता घेत पावसाळ्यात पाण्याचा निचारा गटारातून व्यवस्थित होईल याबाबत दक्षता घेतली आहे.

Post a Comment

0 Comments