कुटुंबाचा आर्थिक डोलारा सांभाळण्यासाठी टेम्पोच्या सहाय्याने तयार केला फिरता मंडप

■लॉकडाऊन मुळे कर्ज बाजारी झालेल्या उच्च शिक्षित गृहिणीने लढवली अनोखी शक्कल..


कल्याण  :  लॉकडाऊनमुळे कर्जबाजारी झालेल्या एका उच्च शिक्षित गृहिणीने नोकरी न करता बँकेतून कर्ज घेऊन एक टेम्पो खरेदी करीत त्यावर आपल्या बुद्धीचा वापर करीत जिद्दीच्या जोरावर चालता फिरता मंडप (स्टेज) उभा करून  कुटूंबाला आर्थिक हातभार लागावा म्हणून हा  पर्याय  निवडल्याचे सांगितले आहे. अश्विनी संतोष जाधव  (वय ३४) असे या गृहिणीचे नाव असून ती कल्याण पूर्वेतील विजयनगर भागात कुटूंबासह राहत असून स्वराज इव्हेंट्स च्या माध्यमातून अनेक छोट्या मोठ्या समारंभात सजावट करण्याचे काम करते.  


       कोरोना काळात केंद्र व राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केला होता. त्यामुळे देशभरात सर्व व्यवसाय ठप्प  होऊन  लाखो कुटूंब यामुळे कर्जबाजारी झाले. तर हजारो नागरिकांच्या नोकऱ्या जाऊन बेरोजगार झाले. त्यामध्ये उच्च शिक्षित गृहिणी अश्विनी यांचे कुटूंबही कर्जबाजारी झाले. त्यातच पतीच्या पगारावर घर खर्च भागवणे जिकरीचे झाले.  त्यामुळे त्यांना आर्थिक चणचण भासत होती. 


       मात्र खचुन न जाता एक तर नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय निवडण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी व्यवसायासाठी एका बँकेकडून ६ लाख रुपये कर्ज घेऊन एक मिनी टेम्पो खरेदी केला. त्याच्या पतीच्या कल्पनेतून या टेम्पोवर आणखी १ लाख रुपये खर्च करून त्याला मंडप (स्टेज) चे स्वरूप दिले.


       या टेम्पोचा उपयोग छोट्या छोट्या कार्यक्रमासाठी स्टेज म्हणून वापरता येईलशिवाय केवळ २० ते ३० मिनिटांत टेम्पोचा स्टेज केला जातो. आजच्या घडीला मंडप अथवा  स्टेजचा खर्च सर्व सामान्य नागरिकांना परवडत नाही. त्यामुळे या टेम्पोचा स्टेज स्वतः दरात त्यांनी कार्यक्रम करणाऱ्या सर्व सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिला.


         टेम्पोचा स्टेज ११ बाय १७ असून यावर छोट्या सभा सभारंभ होऊ शकतात असे अश्विनी यांनी सांगितले. तसेच  अनेक सर्व सामान्य कुटूंबाना विविध कार्यक्रम करताना खर्चामध्ये बचत करणारी हि संकल्पना असून यापासून आमच्या कुटूंबालाही  उपजिविकेचे साधन मिळाल्यानेही सांगितले. एकंदरीतच एका उच्च शिक्षित गृहिणीने खचून न जाता कुटूंबाला हातभार लावण्यासाठी जो पर्यायी निवडला त्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आला.

                

           इतर महिलांनी देखील सरकारी मदतीची अथवा इतर कोणाच्या मदतीची वाट न बघता स्वतः पुढे येऊन आपल्यातील कलागुण ओळखून व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन अश्विनी जाधव यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments