मातीला आणि मातेला कधी विसरू नये - रानकवी तुकाराम धांडे


ठाणे , प्रतिनिधी : सध्या माणसू  चांगलं शिकून प्रगती करत आहे .  ते करत असताना तो मातेला आणि मातीला विसरून जात आहे . हाच माणसाच्या जातीच्या सगळ्यात मोठा पराभव आहे . त्यामुळे मातीला आणि मातेला कधी विसरू नये . असे प्रतिपादन रानकवी तुकाराम धांडे यांनी ठाण्यात केले .  


            अभिनय कट्टयाच्या वतीने ' शोध कवी मनाचा ' हा ऑनलाईन उपक्रम सुरु करण्यात आला आहे . या उपक्रमाचे पहिले पुष्प रानकवी तुकाराम धांडे यांनी गुंफले. अभिनय कट्ट्याचे संचालक दिग्दर्शक किरण नाकती यांनी त्यांना बोलते करत त्यांचा जीवनप्रवास उलगडला . त्यावेळी धांडे यांनी सांगितले , माणसं आज बर्फाळ प्रदेशात  राहतो , माणूस आज वाळवंटात ही राहतो . 


         तो का राहतो तर तिथल्या निसर्गाची त्याची नाळ जुळलेली असते . त्यामुळे मी माणसांना नेहमी सांगतो , ' निसार्गाची आपल्याला हाक असते , त्यासाठी आधी आपल्याला  निसर्ग नीट कळला पाहिजे '. माणसाच्या जीवनाची दोन टोके आहेत , एका आईच्या पोटातून आपण येतो आणि दुसऱ्या आईच्या पोटात आपण कायमचे शांत होतो .  ही दोन टोकं आपल्याला नीट समजली पाहिजेत .  


          माती आणि माता या सख्या  - बहिणी सारख्या आहेत . आपण  आपल्या मातीला विसरलो त्याचंच परिणाम आपल्यावर करोना सारखं संकट आली आहेत . जो तो उठून मुंबईला जातो  पण ते करत असताना तुम्ही तुमच्या मातीपासून तुटून जात आहात . माणूस जिथं कुठे जन्माला येतो तिथला निसर्ग त्याला पोसण्यासाठी समर्थ असतो त्याला विसरून आपण लांब गेलो तर तुमच्यावर अशी संकटं येत राहणार असे धांडे यांनी नमूद केले .   जेव्हा नैसर्गिक संकट येतात त्याला आपण जबाबदार आहोत . निसर्गाला विसरणं म्हणजे आपापल्या मातीला विसरण्यासारखे आहे असे त्यांनी सांगितले .


     आपला जीवनप्रवास उलगडताना तुकाराम धांडे यांनी सांगितले ,  लहानपणापासून भजनाचे ,  तमाशाचे संस्कार झाले . मी कॉलेज मध्ये असताना नाटकात काम करायचो तिथे मला अभिनय सम्राट बोलले जायचे . गावाकडे तमाशात सोंगाड्या म्हणून काम केले तर मला विनोदसम्राट बोलायचे . मी केलेल्या   कविता  सादर करायचो पण त्या लिखित नव्हता , मात्र  कोणी लिहून मागितल्यावर त्या लिहल्या गेल्या . त्या ठरवून लिहलेल्या कविता नव्हत्या तर  त्या सहज लिहल्या गेल्या असे त्यांनी स्पष्ट केले .  


         १२ वी ला असताना स्टेजवर काम करताना लांबून लांबून माझे मित्रमंडळी माझं काम बघायला येत . ते करत असताना  मी  कविता करत गेलो , कवितेची वही तयार झाली , पण समाजात तथाकथित बाकीचे जे लोक होते , ते दखल घेत नव्हते किंवा त्यांना ती समजत नव्हती . चांगलं काय हेच कळत नसेल तर दखल काय कोण डोंबल घेणार ? 


       त्यावेळी लिहलेल्या कविता त्याच पुढे  जगात गाजत गेल्या .  या कविता अशा लिहलेल्या गेल्या कि गावाकडे ज्यांना अक्षर ओळख नाही , त्यांनी कधी शाळेचं तोंड पाहिलं नाही अशा लोकांना त्या समजत असतं हे त्या कवितांचे वैशिष्ट्य होते . पूर्णपणे स्वतःच जगणं , जे आतून आले तेच मी मांडत गेलो .


     माझा कवितासंग्रह आला २००८ साली , त्याचवर्षी त्याला महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट वाड्मय पुरस्कार मिळाला .  त्याची प्रत नाना पाटेकर यांनी घेतली . त्यांचे मित्र विनायक दादा पाटील नाशिक चे . त्यांनी माझा कवितासंग्रह करण्यासाठी मदत केली . मी फट स्टेजवरचा माणसू आहे त्यामुळे पुस्तक निर्मितीची प्रक्रिया मला ठाऊक नव्हती . पण त्या माणसाने माझ्या कविता ऐकल्या , त्यांनी सांगितले तुझ्या कवितांचे पुस्तक आले पाहिजे , मी सांगितले मला काय माहित नाही .  


        त्याने मला सांगितले हे जगाचे धन आहे ते जगात गेलं पाहिजे .  तू कविता सादर करशील , पण तुझ्यानंतर त्या नष्ट होऊन जातील अशी मोठी माणसं संपर्कात आली . त्यांनी माझी वही घेऊन सगळं केलं , त्या प्रकाशकाने माझ्याकडून एकही पैसा घेतला नाही . राजहंस प्रकाशन ची वितरण व्यवस्था एवढी दांडगी आहे कि रातोरात ते पुस्तक पार अमेरिकेपर्यंत गेलं . जिथे मराठी माणसं आहेत तिथपर्यंत गेलं , त्याचप्रमाणे ते पाटेकर यांच्याकडे गेलं . 


          पाटेकर यांनी मला भेटण्याची इच्छा व्यक्त केली . १२ मार्च ला टिळक स्मारक मंदिर पुणे येथे भेटण्याचा योग आला . तिथे १० - १२ कवी होते . तिथे नाना पाटेकर यांनी माझं नाव घेऊन माझ्या कविता पाठ असल्याचे सांगितले . मला मिठी मारून माझं कौतुक केलं . त्या कार्यक्रमात नाना पाटेकर यांनी माझी कविता ' वाटणी '  माझ्यासोबत बोलण्याची इच्छा व्यक्त केली .  


     महाविद्यालयात असताना भूगोल मधून बी . ए केलं . ज्यावर्षी बी . ए झालो , त्याचवर्षी लग्न झालेलं आणि त्याचवर्षी एका कंपनीत कामगार म्हणून नोकरीला लागलो . त्यामुळे पेन आणि कागद यांचा संपर्क संपला होता .  नोकरीला कामगार म्हणून काम सुरु केल्यावर मला पहिला पगार १८० रुपये मिळाले . पण लग्न झालेलं , घरची भरमसाठ गरिबी , त्यामुळे नोकरी टिकवून ठेवण्याचा मी निश्चय केला .


         काम करायचे आणि पाच वाजता मोकळे व्हायचो , नंतर अशी सवय लागली कि काम हातानं होत राहिले , पण डोक्यात कविता सुरु असायची .  तरी देखील आदर्श कामगार आणि महराष्ट्रातील प्रसिद्ध कवी असा नावलौकिक झाला . ' तुकोबा आणि आजोबा ' ही कविता मांडे यांनी सादर करत डोंगराची व्यथा आणि कथा मांडली . माणूस जिथं कुठे आहे तिथला निसर्ग त्याला नीट कळलं पाहिजे तरच त्याच सुख - दुःख माणसाला कळू शकेल असते धांडे यांनी सरतेशेवटी नमूद केले.

Post a Comment

0 Comments