राष्ट्रवादीचे उत्तर भारतीय कार्ड ... उत्तर भारतीयांना मिळवून देणार न्याय


डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण- डोंबिवली शहरात राष्ट्रवादीला उतरती    कळा पाहून हा पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सार्वत्रिक निवडणुकीत हाताच्या बोटावरील पाच उमेदवार निवडणूक आणू शकणार नाही असा दावा विरोधक  करत होते. मात्र राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आणि राज्यातील सर्व शहरात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये उत्साह निर्माण झाला.


        कार्यकर्त्यांचा जोश वाढविण्यासाठी प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील , मंत्री जितेंद्र आव्हाड , माजी खासदार आनंद परांजपे आणि प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी डोंबिवली शहरात कार्यकर्त्याची प्रत्यक्ष भेट घेऊन मार्गदर्शन दिले.आता यात उत्तर भारतीयांना आपल्या पक्षाकडे आकर्षित करण्यासाठी राष्ट्रवादीने उत्तर भारतीय कार्ड बाहेर काढले आहे.हे कार्ड निवडणुकी शिवसेना, भाजप , मनसे आणि काँग्रेसला आपली ताकद दाखविण्यासाठी किती उपयोगात येईल लवकरच दिसेल.डोंबिवली पूर्वेकडील गोग्रासवाडी येथे राष्ट्रवादीच्या डोंबिवली शहर  उत्तर भारतीय सेलच्या जनसंपर्क कार्यालयाचे  उदघाटन करण्यात आले.


              डोंबिवली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष  सुनील जोशी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी  उत्तर भारतीय सेल डोंबिवली शहर अध्यक्ष दिलीप विश्वकर्मा, पांडुरंग चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.विश्वकर्मा यांनी उत्तर भारतीयांवरील होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा प्रयत्न असणार असे यावेळी सांगितले.
   

             डोंबिवली शहरात उत्तर भारतीयांची संख्या सुमारे 35 ते 40 टक्के आहे.मात्र ते विविध राजकीय पक्षात विभागले गेले आहेत. लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूकित या समाजाचे मतदान राजकीय पक्ष ओळखून आहेत.यासाठी विविध राजकीय पक्ष उत्तर भारतीयांना जवळ करून राजकीय फायदा करून घेतात यात नवीन काही नाही.
 


          उत्तर भारतीयांसाठी राष्ट्रवादीचे हे कार्ड नक्की चालणार अशी कार्यकर्त्यांची चर्चा आहे.तर या समाजातील लोकांना शहरात राहताना, काम करताना अनेक समस्या भेडसावत असतात. त्यांच्यासाठी राष्ट्रवादी आपले घड्याळ वेगाने चालवत असल्याचे एकूण चित्र दिसत आहे. कार्यालयाच्या उदघाटननंतर विश्वकर्मा यांच्याकडे अनेक उत्तर भारतीयांनी संपर्क साधून आपल्या समस्या मांडल्या.


चौकट 

            काही वर्षांपूर्वी उत्तर भारतीय विद्यार्थ्यांना डोंबिवलीतील मनसैनिकांनी मारहाण केल्यानंतर राज्यातील इतर शहरात सुरुवात झाली.त्यामुळे उत्तर भारतीय व मनसे यांच्यातील वाद अजूनही संपला नाही.भविष्यात उत्तर भारतीयांचा मनसैनिकांनी वाद झाल्यास राष्ट्रवादी  उत्तर भारतीयांच्या पाठीशी उभी राहिल्यास शहरात मनसे विरुद्ध राष्ट्रवादी अशी राजकीय लढत निवडणुकीत दिसून येण्याची शक्यता  वर्तवली  जात आहे.

--------------------------------------

            डोंबिवलीत 35 ते 40 टक्के उत्तर भारतीय ...
डोंबिवलीच्या लोकसंख्या 15 लाखांच्या वर गेली असून यात 35 ते 40 टक्के उत्तर भारतीय आहेत.सध्या उत्तर भारतीयांसाठी शिवसेना किंवा भाजपचे उत्तर भारतीय सेल आहेत.आता मात्र उत्तर भारतीयांना आणखी एक म्हणजे राष्ट्रवादी पक्ष पर्याय म्हणून समोर उभा आहे.          परंतु सहजासहजी उत्तर भारतीय राष्ट्रवादीकडे आकर्षित होतील असे दिसत नाही.उत्तर भारतीयांवरील न्यायासाठी  राष्ट्रवादीने आपले कार्ड काढले असले तरी भविष्यात उत्तर भारतीय राष्ट्रवादीचे घड्याळ हाती घालतील का असा प्रश्न विचारला जात आहे.

Post a Comment

0 Comments