केडीएमसीच्या जे, ड व ब प्रभागातील टप-यांवर निष्कासनाची कारवाई


कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या निर्देशानुसार जे प्रभागाच्या सहा. आयुक्त हेमा मुंबरकर यांनी लोकग्राम नाल्याजवळील बगिचाच्या आरक्षित भूखंडावर असलेल्या ३५ अनधिकृत टपऱ्या निष्कासनाची धडक कारवाईअनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारीमहानगरपालिका पोलीस कर्मचारी व १ जेसीबीच्या सहाय्याने केली.


त्याचप्रमाणे ड प्रभागाच्या सहा. आयुक्त सविता हिले यांनी कल्याण पूर्व खडेगोळवली येथील फुटपाथवरील दुकानांचे वेदरशेडहातगाड्याबाकडेपिंजरे व इतर अशा एकूण ३८ अतिक्रमणांवर निष्कासनाची कारवाई केली. हि कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारीमहापालिका पोलिस व १ जेसीबीच्या सहाय्याने करण्यात आली.


ब प्रभागातही सहा. आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी कल्याण‍ पश्चिम साई चौक येथील २ पत्र्याची दुकानेगोदरेज हिल रोड वरील  शेडरिंग रोड गांधारी सर्कल येथील ३ शेड अशी एकूण ७ अतिक्रमणे निष्कासनाची कारवाई अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभागाचे कर्मचारीमहापालिका पोलिस व १ जेसीबीच्या सहाय्याने केली.

Post a Comment

0 Comments