वैद्यकीय कोल्ड चेन उत्पादनांची १००,००० युनिट्स क्षमता असणा-या कारखान्याचे भारतात उद्घाटन

■बी मेडिकल सिस्टम्सची निर्मिती; उत्पादनांमध्ये वॅक्सिन रेफ्रिजरेटर्स, फ्रीजर्स आणि ट्रान्सपोर्ट बॉक्सेसचा समावेश ~

भारत, १२ जानेवारी २०२२ : बी मेडिकल सिस्टम्स या, लग्झेंमबर्गमध्ये मुख्यालय असलेल्या, वैद्यकीय कोल्ड चेन सोल्युशन्समधील आघाडीच्या जागतिक कंपनीने, आपल्या भारतातील नवीन उत्पादन कारखान्याचे उद्घाटन गुजरामधील मुंद्रा येथे, अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मान्यवरांच्या उपस्थितीत केले.


      १०० कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीतून उभाण्यात आलेल्या या कारखान्याची वार्षिक उत्पादन क्षमता वैद्यकीय कोल्ड चेन उत्पादनांची १००,००० युनिट्स एवढी आहे. या उत्पादनांमध्ये वॅक्सिन रेफ्रिजरेटर्स, फ्रीजर्स आणि ट्रान्सपोर्ट बॉक्सेसचा समावेश होतो. ही उत्पादनक्षमता मागणीच्या आधारे त्वरित वाढवली जाऊ शकते. मुंद्रा येथील कारखाना हा कंपनीचा युरोपबाहेरील पहिलाच उत्पादन कारखाना आहे आणि यामुळे कच्छ भागात रोजगाराच्या शेकडो संधी निर्माण होणे अपेक्षित आहे.


      लग्झेंबर्गचे माननीय पंतप्रधान श्री. झेविअर बेटेल म्हणाले, “माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत वर्षभरापूर्वी झालेल्या पहिल्या व्हर्च्युअल बैठकीची फलश्रुती एवढ्या झटपट मिळाली याबद्दल मला खूप समाधान वाटते. बी मेडिकल सिस्टम्सच्या टीमने गुजरातमध्ये वर्षभराहूनही कमी काळात हा मेक इन इंडिया उत्पादन कारखाना उभा केला आणि वैद्यकीय कोल्ड चेन उपकरणांचे उत्पादनही सुरू केले. याबद्दल गुजरात राज्याच्या गुंतवणूकपूरक धोरणांचे मी कौतुक करतो.” त्यांनी भारताचे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी, परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालय, गुजरात सरकार, इन्व्हेस्ट इंडिया आणि इंडेक्सटब यांचे, बी मेडिकल सिस्टम्सच्या भारतातील प्रवासामध्ये, दिलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले.


      भारत सरकारच्या मत्स्योत्पादन, पशुपालन व दुग्धविकास मंत्रालयाचे माननीय केंद्रीयमंत्री श्री. पुरुषोत्तम रुपाला यांनी बी सिस्टम्सच्या भारतात प्रथमच उत्पादित बहुमार्गी वॅक्सिन रेफ्रिजरेटर/फ्रीजर आणि/किंवा आईस-पॅक फ्रीजरचे अनावरण केले. राष्ट्रीय पशू आजार नियंत्रण कार्यक्रमामध्ये हे उत्पादन मोठी भूमिका बजावणार आहे. “मी भारत आणि लग्झेंबर्गच्या पंतप्रधानांची प्रशंसा करतो. या दोघांच्या द्रष्ट्या नेतृत्वाचा परिणाम म्हणून आज हा द्विपक्षीय प्रकल्प प्रत्यक्षात आला आहे. या कारखान्यामुळे केवळ लक्षावधी मानवांचेच नव्हे, तर पशूंचेही प्राण वाचणार आहेत. हा कारखाना केवळ मानवी आरोग्यसेवा परिसंस्थेच्याच नाही, तर पशू आरोग्यसेवा परिसंस्थेच्याही मागण्या पूर्ण करणार आहे,” – असे माननीय केंद्रीयमंत्री श्री. पुरुषोत्तम रुपाला म्हणाले.


      “बी मेडिकल सिस्टम्ससाठी हे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासारखे आहे, ऐतिहासिक क्षण आहे. भारतातील आरोग्यसेवा संरचनेला सहाय्य करणे आमच्यासाठी सन्मानाची बाब आहे. आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि नवोन्मेष आणत आहोत. त्याद्वारे खात्रीशीर वैद्यकीय कोल्ड चेन देशाच्या प्रत्येक भागात पुरवणे शक्य होईल. हा कारखाना सुरू करणे म्हणजे भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ धोरणाप्रती आम्ही दाखवत असलेल्या बांधिलकीचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे भारताला जगाची वॅक्सिन कोल्ड चेन राजधानी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे,” असे बी मेडिकल सिस्टम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जेसल दोशी म्हणाले.

Post a Comment

0 Comments