पक्षी व मासे विक्री दुकानाला आग


कल्याण शंकर जाधव ) विविध पक्षीप्राणी आणि मासे विक्री करणाऱ्या तीन दुकानाला आग लागल्याची घटना बुधवारी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास कल्याण पश्चिमेकडील रामबाग परिसरात घडली.या आगीत दुकानातील अनेक पक्षी व मासे होरपळून मृत पावले. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण समजू शकले नाही.

   


       या दुकानांमध्ये लव्हबर्डसकबुतरेससे आणि माशांची विक्री केली जायची. दुकानाला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत स्थानिकांनी आपल्या परीने ही आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र या आगीने अवघ्या काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने दुकानातील अनेक पक्षीससे आणि माशांचा  होरपळून मृत्यू पावले.        काही वेळाने  घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाची गाडी आल्यावर जवानांनी तातडीने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यातही काही पक्षीससे माशांना जीवदान दिले. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत ठोस कारण समजू शकलेले नसले तरी शॉर्ट सर्किटमूळे ही आग लागण्याचा प्राथमिक अंदाज अग्निशमन अधिकारी विनायक लोखंडे यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments