मुंबईतील इमादार पोलिसाने भिवंडीतील कॅमेरा मनला महागडा आयफोन केला परत, लोणावळा टोल नाक्याच्या स्वच्छता ग्रूहात विसरला होता आयफोन..


भिवंडी दि 2  (आकाश गायकवाड ) शहरातील नवीचाळ येथील  रहिवाशी तसेच कॅमेरामन  राहुल राजेंद्र घैसास हे काही कामानिमीत्त कोल्हपुरला गेले होते ते परतीच्या प्रवासात लोणावळा टोल नाक्यावरील स्वच्छता गृहात गेले असताना तेथेच आपला महागडा आयफोन 12  विसरले त्यानंतर  त्यांच्या लक्षात आल्या बरोबर ते परत तेथे जाऊन शोध घेतला असता तो तेथे सापडला नाही दुस-या दिवशी चेंबुर क्राईमब्रांच युनिट क्र ६ येथून  त्यांचे  वडील भिवंडी शहरातील नामंकित जेष्ठ  कॅमेरामन  राजेंद्र धैसास यांच्या  मोबाईल वर फोन आला की आपल्या कडील कोणाचा आयफोन हरवला आहे व तो आपण ओळख पटवुन घेऊन जाणे असे सांगण्यात येताच राहुल धैसास यांनी  लगेच तेथे गेले असता, तेथील इमानदार पोलीस नाईक नितीन तुपे यांना तो आयफोन 12 सापडला होता.


           त्यांनी आपले वरीष्ठ प्रभारी पोलीस निरिक्षक रविंद्र साळुंखे यांच्या हस्ते परत सोपवला त्यांना बक्षीस म्हणुन पैसे देताना त्यांनी ते नम्रपणे नाकारले त्यामुळे आजही मुंबई मधील पोलिसांची इमानदारी भिवंडीकरांना पाहावयास मिळाली असून भिवंडीतुन मुंबईमधील पोलीस नाईक नितीन तुपे यांचे कौतुक होत आहे..

Post a Comment

0 Comments