प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त कारवाईत ५० हजार रुपये दंड वसूल


डोंबिवली ( शंकर जाधव ) महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत 3 जानेवारी ते  9 जानेवारी या दरम्यान प्लास्टिक निर्मुलन" सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.डोंबिवली पूर्वेकडील 'ग' प्रभागाच्या सहा. आयुक्त रत्नप्रभा कांबळे यांनी प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक नरेंद्र धोत्रे व आरोग्य निरिक्षक सुर्वे यांचे समवेत डोंबिवली पूर्व उत्कर्ष चायनिज सेंटर, सचिन स्नॅक्स बार, बिस्मिला बिर्याणी कॉर्नर सेटर इ. यांच्याकडील 4 किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करुन त्यांना 15 हजार दंड आकारला.


         तर  कल्याण येथील महापालिकेच्या 'क' प्रभागातही सहा.आयुक्त सुधिर मोकल यांनी प्रभागातील मुख्य आरोग्य निरिक्षक योगेश जगताप, आरोग्य निरिक्षक संदीप खितमतराव, दत्तराम सावंत, जगन्नाथ वड्डे यांचे समवेत कल्याण पश्चिम येथील सावंत स्नॅक्स, मधुरम डेअरी,बिकानेर स्वीट्स, सद्गुरु कृपा, मे साईबाबा किराणा स्टोअर्स इ. यांच्याकडील 8.5 किलो प्रतिबंधित प्लास्टिक पिशव्या जप्त करुन त्यांना  35 हजार दंड आकारला.

Post a Comment

0 Comments