बालिका दिनी केडीएमसीच्या वतीने १० विद्यार्थिनींना हॅपीनेस किट्सचे वाटप

■आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनी केडीएमसीतर्फे अभिवादन...

  

कल्याण, प्रतिनिधी  : आद्य शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती दिनानिमित्त महापालिका मुख्यालयात आज त्यांच्या प्रतिमेस आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी  उपस्थित अतिरिक्त आयुक्त सुनिल पवारमुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळेउपायुक्त बाळासाहेब चव्हाणपल्लवी भागवतअर्चना दिवेविनय कुलकर्णीअनंत कदमवैदयकीय आरोग्य अधिकारी अश्विनी पाटीलमहापालिका सचिव संजय जाधवसहाय्यक आयुक्त इंद्रायणी करचे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग यांनी देखील सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पसुमने अर्पण करून अभिवादन केले.


क्रांतीज्योती सावित्रीबाई यांचा जयंती दिन हा सर्वत्र "बालिका दिन" म्हणूनही साजरा केला जात असल्यानेत्यांच्या जयंतीचे औचित्य साधून आज महापालिकेच्या शाळांमधील १०  विद्यार्थिनींना (बालिकांना)  महापालिका शिक्षण मंडळ व अक्षयपात्र संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने लेखन साहित्य व इतर जीवनावश्यक वस्तूंचा अंतर्भाव असलेल्या हॅपीनेस किट्सचे वाटप महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी ,इतर अधिकारी वर्ग व शिक्षण विभागाचे उपायुक्त यांच्याहस्ते करण्यात आले.


महापालिकेच्या घनकचरा विभाग मार्फत दि. ३ ते ९ जानेवारी हा सप्ताह प्लास्टिक निर्मूलन म्हणून साजरा केला जात असल्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या अधिकारी व कर्मचारी वर्गातर्फे यावेळी प्लास्टिक निर्मूलनाची शपथ घेण्यात आली.


त्याचप्रमाणे कल्याण पूर्वेतील पालिकेच्या जे प्रभाग कार्यालयात; अज्ञानाच्या अंधारात खितपत पडलेल्या तमाम महिला वर्गाला ज्ञानाचा प्रकाश दाखविणा-या अन चूल-मूल या संकल्पनेत अडकलेल्या महिलांना प्रवाहात आणणा-या ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस उपायुक्त रामदास कोकरे  यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. तसेच प्लास्टिक निर्मूलनची शपथ सहा. आयुक्त हेमा मुंबरकरप्रमाग क्षेत्रातील आरोग्य निरिक्षकमुख्य आरोग्य निरिक्षक तसेच कर्मचारी वर्गाने शपथ घेतली. यात प्रभागातील बहुसंख्य कर्मचारी वर्ग उपस्थित  होता.

Post a Comment

0 Comments