अजय सावंत यांना उद्योग भूषण पुरस्कार जाहीर

■नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसच्या वतीने देण्यात येणार पुरस्कार..


कल्याण : कल्याण मधील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक अजय सावंत यांना उद्योग भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. शुक्रवारी ७ जानेवारी रोजी नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीसच्या वतीने सोलापूर येथे हा पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे.


       नॅशनल दलित मूव्हमेंट फॉर जस्टीस संघटना अराजकीयधर्मनिरपेक्ष सामाजिक संघटना असून दतित आदिवासी मानवाधिकार कार्यकर्तेअत्याचार पिडीतशिक्षणतज्ञ कायदेतज्ञ यांची सामाजिक चळवळ आहे. समता व बंधुता अबाधित राहण्या करीता जातीभेद व मुख्यत्वे अस्पृश्यता निवारणावर व त्यावर आधारित हिंसा व अत्याचाराशी संबंधित विषयावर कायदेशीररीत्या काम करून सामाजिकआर्थिकराजकीयजाणिक व सांस्कृतिक अधिकाराची पाठराखण करून अनुसूचित जाती व जमाती समुदायाला न्याय देण्याचे प्रयत्न करते.


नॅशनल दतित मुव्हमेंट फॉर जस्टीस हि संघटना महाराष्ट्रासह भारतातीत १८ राज्यात कार्यरत आहे. महाराष्ट्रात मागील २५ वर्षा पासून एट्रोसिटी कायदा आणि अनुसूचित जाती-जमातींच्या अधिकारावर विविध उपक्रमलॉंगमार्च, कार्यशाळापरिषदा इत्यादीचे आयोजन करण्यात आले आहे. याचाच एक भाग म्हणून ७ जानेवारी रोजी राज्य स्तरीय दुसरे महाअधिवेषन सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथे आयोजित करण्यात आले आहे. या महामेळाव्यात संपूर्ण देशातून सामाजिकराजकीयप्रशासकीयशैक्षणिकव्यायालईनउद्योजकताकतापत्रकारिता व इतर क्षेत्रातीत दिग्गज पुढारी व मान्यवर यांचा सहभाग असणार आहे.


       याच कार्यक्रमात गेले अनेक वर्षे सामाजिक आणि उद्योजक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अजय सावंत यांना उद्योग भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याने सावंत यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  

Post a Comment

0 Comments