आंबेडकर रोड येथील सामाजिक कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


ठाणे (प्रतिनिधी)-  राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत आंबेडकर रोड येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन जाधव,राजा जाधव, इरफान शेख, शिवा कारकून यांच्यासह 150 महिलांसह अनेक कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आणि नवी मुंबईचे युवाध्यक्ष अन्नु आंग्रे  यांनी या सर्वांचे पक्षात स्वागत केले.


        सचिन जाधव,राजा जाधव, इरफान शेख, शिवा कारकून  हे अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यात सक्रीय आहेत. आंबेडकर रोड परिसरात या सर्वांचा दांडगा जनसंपर्क आहे. या सर्वांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष  शरदचंद्र पवार यांच्या विचारधारेला अभिप्रेत राहून गृहनिर्माण मंत्री ना. डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून सचिन जाधव,राजा जाधव, इरफान शेख, शिवा कारकून आणि 150 महिलांसह शेकडो सहकार्‍यांनी आज डॉ. आव्हाड यांच्या निवासस्थानी पक्षप्रवेश केला.  यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर, ठाणे शहर जिल्हा युवक प्रमुख संघटक शिवा ठाकूर, संतोष वाघमारे, शाम शिंदे आदी उपस्थित होते.


        यावेळी गृहनिर्माण मंत्री डॉ. आव्हाड म्हणाले की, सर्वांना परिवर्तनाची अपेक्षा आहे. लोकांची कामे होत आहेत. लोकांना राष्ट्रवादीवर विश्वास आहे. आपले भविष्य कोणाच्या हाती सुरक्षित आहेत, हे युवकांना समजत आहे. त्यामुळेच ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करीत आहेत. युवकांची ही ऊर्जा नक्कीच परिवर्तन घडवेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Post a Comment

0 Comments