कोरोना काळातील सामाजिक योगदान हे मानवतेचे दर्शन घडवणारे - माजी आमदार नरेंद्र पवार

■ गोल्डन ग्रूपच्या वतीने कोरोना योद्ध्यांना समाज भूषण पुरस्काराने सन्मानित..

कल्याण : कोरोनाचा कठीण काळ आणि त्या दरम्यान मिळत असलेले समाजातील अनेकांचे योगदान हे महत्वपूर्ण आहे. एकीकडे डॉक्टर प्रयत्नशील होते आणि दुसरीकडे सामाजिक भावना जागृत ठेऊन काम करणारा घटक होता. गोल्डन ग्रुप हा त्यापैकीच एक आहे, मात्र केवळ कोरोना काळातच नाही तर कायमस्वरूपी समाजात अंत्योदय घटकांना या ग्रुपच्या माध्यमातून मदत होत असते.


           वेगवेगळ्या भागात धान्य वाटप करून योगदान दिले जाते. सामाजिक काम करणाऱ्या आणि कोरोना काळात सक्रिय मदत केलेल्या नागरिकांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करणे हा आनंदाचा क्षण आहे. कोरोना काळातील सामाजिक योगदान हे मानवतेचे दर्शन घडवणारे असल्याचे मत माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले.


         संस्कृती संगम गोल्डन ग्रुप आयोजित स्नेह मिलन सन्मान सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमात अध्यक्षस्थानी माजी आमदार नरेंद्र पवार होते. जेष्ठ नागरिक आणि समाजातील सुज्ञ नागरिकांना एकत्रित करत गेली अनेक वर्षे सातत्याने सामाजिक क्षेत्रात गोल्डन ग्रुप काम करत असल्याचेही नरेंद्र पवार यांनी सांगितले 

 
         यावेळी गोल्डन ग्रुपचे अध्यक्ष डॉ. विजय पंडित,आचिवर्स कॉलेजचे चेअरमन डॉ.महेश भिवंडीकर,समाजसेवक डॉ. पंकज उपाध्याय,रवि गुप्ता, विमलेश तिवारी, संतोष शिंगोळे आदी. पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments