मोबाईल टॉवर्सच्या मालमत्ता करापोटी रिलायन्स जीओ कडून १६.५३ कोटी रक्कम महापालिका तिजोरीत जमा


कल्याण : महापालिकेच्या कर निर्धारण व संकलन विभागाकडून रिलायन्स जिओ कंपनीच्या नव्याने कर निर्धारण करण्यात आलेल्या ९९ मोबाईल टॉवर्सच्या मालमत्ता करापोटी १६.५३ कोटीचे धनाकर्ष महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यासाठी रिलायन्स जिओचे मॅनेजर यांनी मे.सुमन इन्फ्रा सर्व्हिसेस यांच्या माध्यमाने  महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्याकडे सूपूर्द केले.


हि वसूली महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कर संकलन व निर्धारण विभागाचे प्र.उपायुक्त विनय कुळकर्णी यांनी केली असून यावर्षीचे मालमत्ता कर वसूलीचे उद्दीष्ट पूर्ण करण्यसाठी कठोर कारवाईचा अवलंब करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी यांनी दिले आहेत. 


आपल्या मिळकतीचा मालमत्ता कर विहित वेळेत महापालिकेत जमा करून महापालिकेस सहकार्य करावे व कारवाई टाळावी असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments