केडीएमसी क्षेत्रात २६५३ विद्यार्थ्यांचे लसीकरण १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरणास चांगला प्रतिसाद

 


कल्याण :  सोमवार पासून  केडीएमसी  क्षेत्रातील ६ लसीकरण केंद्राच्या माध्यमातून  शाळा ,कनिष्ठ महाविद्यालयातील १५ ते १८ या वयोगटातील मुलांसाठी लसीकरणाचे सुविधा उपलब्ध करून दिली होती. 


          या लसीकरणाचा चांगला प्रतिसाद मिळाला असून  लसीकरण केंद्रांवर एकूण १५४३ मुलांचे (विद्यार्थ्यांचे) आणि शाळा ,कनिष्ठ महाविद्यालयात १११० मुलांचे(विद्यार्थ्यांचे) अशा एकूण २६५३ विद्यार्थी  ,विद्यार्थिनींचे  कोविड लसीकरण  करीत लसवंत करण्यात आले.

Post a Comment

0 Comments