आरटीओ कार्यालया आवारातील टपर्यावर पालिकेची धडक कारवाई कारवाई आधीच टपऱ्या गायब


कल्याण  : कल्याणच्या आरटीओ कार्यालयाला अनधिकृत टपऱ्यानी विळखा घातला असून आरटीओ संबधित कामे करण्याचा  दलालांचा मोठ्या प्रमाणावर आरटीओ कार्यालयात वावर असतो त्यातूनच गेल्या महिन्यात आरटीओच्या कर्मचाऱ्याला मारहाणीचा प्रकार घडला होता.

   
            आरटीओ कार्यालयाच्या आवारात बेकायदेशीर पणे थाटलेल्या टपर्यावर पालिकेने बुधवारी धडक कारवाई सुरुवात करण्या पूर्वीच टपरी धारकांनी आपली टपऱ्या घेऊन पळ काढला तर उरलेल्या दोन तीन टपर्यावर पालिकेने कारवाई करीत जप्त केल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली.


                कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज मधील परिवहन प्रादेशिक कार्यालयांच्या आवारातील फूटपाथ वर  गेल्या काही महिन्या पासून राजकीय पक्षांच्या पदाधिकार्याच्या आशीर्वादाने ३० ते ४० बेकायदेशीर अनधिकृत टपऱ्याधारकांनी  थाटल्या आहेत. या बेकायदेशीर टपरीधारकांना ना आरटीओची ना पालिकेची भीती नसल्याने या टपरी धारकांची दादागिरी वाढली आहे.  या बेकायदेशीर टपऱ्या मधूनच आरटीओ संबधित परवाने व नूतनीकरण करण्याची कामे आरटीओ चे दलाल करत असतात . 


           गेल्याच महिन्यात या टपऱ्या मधील  एका दलालाने आरटीओचे कर्मचारी मनीष जाधव याला क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मारहाण केली होती .या मारहाणी मुळे आरटीओ कार्यालया बाहेरील बेकायदेशीर टपर्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता .या बेकायदेशीर तपर्याच्या कारवाईसाठी आरटीओ कार्यालयाच्या कर्मचर्यानी कारवाईची मागणी।केली होती .


          तसेच या बेकायदेशीर टपर्‍या मुळे येण्या जाण्यास  वाहतुकीची अडथळा निर्माण केला  होतअसल्याने या टपर्यावर कारवाई साठी माहिती अधिकार कार्यकर्ता इंद्रमणी उपाध्याय यांनी या विषयी पालिकेच्या ब प्रभाग क्षेत्र कार्यालया कडे तक्रार केली होती.

 
          या तक्रारी नुसार अतिक्रमण ब" कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त चंद्रकांत जगताप यांनी आपल्या पथकासह ३० ते ४० अतिक्रमानावर धडक कारवाई साठी जेसीबी पोलीस फाटा आणि कर्मचारी गेले असता त्यापूर्वीच टपरी धारकांनी आपल्या टपऱ्या घेऊन पळ काढला तर उरलेल्या दोन तीन टपर्यावर पालिकेने कारवाई करीत टपऱ्या जप्त केल्या सदरची कारवाई करताना कर्मचारी बाळू शिंदे म्हात्रे , शेवाळे महाले आणि पथक कर्मचारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments