सार्वजनिक शौचालयाच्या बांधकामा बाबत राष्ट्रवादीने मानले पालिकेचे आभार

■राष्ट्रवादीच्या नोवेल साळवे यांनी मानले खुल्या पत्राद्वारे आभार...


कल्याण : कल्याण महापालिकेने सर्वा सामान्य जनतेच्या सोयीसाठी पुर्वी असलेल्या ठिकाणी सार्वजनिक मुतारी बांधत असल्याने राष्ट्रवादीच्या नोवेल साळवे यांनी खुल्या पत्राद्वारे पालिका प्रशासनाचे आभार मानले आहेत.


कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाच्या वतीने कल्याण कोर्टच्या भिंतीला लागुन  कल्याण वाहतूक पोलीस कार्यालय समोर पुर्वी असलेल्या ठिकाणी सार्वजनिक मुतारी व शौचालय बांधण्याचे काम सुरू केले आहे. हे स्वागतार्हच आहे.  संपूर्ण बाजार परिसरात एकही स्वच्छ सार्वजनिक मुतारी सध्या दिसत नाही. ज्याच्यामुळे बाजारासाठी येणाऱ्या जनतेला लघवी करण्यासाठी कुठलीच सोय नाही. तेवढया परिसरातील दुकानदार व्यापारी लोक उघडयावर कोर्टाच्या भिंतीवर लघवी करताना दिसतात.


 पुर्वी याच ठिकाणी सार्वजनिक मुतारी आणि शौचालय होते जे महापालिकेने रस्ता रुंदीकरणात तोडले होते. त्यावेळेस समोरच पोलीस उपायुक्त यांचे कार्यालय होते. परंतु कोणालाही त्या मुतारीचा त्रास नव्हताकारण सर्व लोक सामान्य जनतेचे अडचण समजत होते. आताही या मुतारीच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या लोकांनी सर्व सामान्य जनतेचे अडचण समजून घ्यावेत अशी मागणी राष्ट्रवादीच्या नोवेल साळवे यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments