प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात केडीएमसीची कारवाई सुरूच

■दोन दिवसात सुमारे १६७ किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त आणि १ लाख ६० हजारांचा  दंड वसूल..


कल्याण : प्रतिबंधित प्लास्टिक विरोधात महापालिकेने आपली कारवाई सुरू ठेवली असून महानगरपालिकेच्या विविध  प्रभागात प्रभाग अधिकारीआरोग्य निरीक्षक यांच्या पथकांनी गेल्या दोन दिवसात सुमारे १६७  किलो प्रतिबंधित प्लास्टिक विविध दुकानातून जप्त केले आणि १ लाख ६० हजार  इतका दंड संबंधितां कडून आकारला आहे.


डोंबिवली येथील फ आणि ग प्रभागात रेल्वेस्थानक लगतच्या परिसरात ग प्रभाग क्षेत्र अधिकारी रत्नप्रभा कांबळे यांनी तेथील नागरिक व व्यापाऱ्यांना प्रतिबंधित प्लास्टिकचा वापर न करणे बाबत अवाहन करून जनजागृती केली त्याच प्रमाणे फ प्रभागातील भाजी विक्रेत्यांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले. 


आय प्रभागात ही प्लास्टिक बंदी बाबत सहा. आयुक्त संजय साबळे यांनी व्यापारी संघटना व महिला बचत गट यांची एकत्रित सभा घेऊन त्यांना प्रतिबंधित प्लास्टिक व थर्माकोल न वापरणे बाबत सूचना केल्या.


Post a Comment

0 Comments