दिवंगत गीतकार विनायक पाठारे यांच्या कुटुंबियांची केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी घेतली सांत्वनपर भेट


मुंबई दि.11 - आंबेडकरी चळवळीचे गीतकार संगीतकार  साहित्यिक कवी दिवंगत विनायक पाठारे यांच्या कुटुंबियांची आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी सांत्वनपर भेट घेतली.  नाशिक येथील समता नगर टाकळी  येथीलदिवंगत विनायक पाठारे यांच्या  निवासस्थानी ना.रामदास आठवले यांनी भेट देऊन पठारे कुटुंबियांना रिपाइं तर्फे 50 हजारांची मदत केली.


         यावेळी रिपाइं चे नाशिक जिल्हा अध्यक्ष प्रकाश लोंढे; चंद्रशेखर कांबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते. दिवंगत विनायकदादा पाठारे यांची पत्नी; दोन मुले;सुना;नातवंडे असा परिवार यावेळी उपस्थित होता.दिवंगत विनायक पाठारे यांच्या एका मुलास चांगली नोकरी मिळवून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे अश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले.


         आंबेडकरी चळवळीचे दिवंगत लोककवी ; गितकार; विनायकदादा पाठारे हे दलित पँथर च्या काळात मला नेहमी भेटत असत. चांगली गीते लिहीत असत. लोककलावंत गीतकार गायक यांचा मला  नेहमी पाठिंबा  राहिला आहे. विनायक पाठारे यांचा माझ्यावर खुप विश्वास आणि प्रेम होते.


        विनायक पाठारे यांचे  साहित्यिक आणि लोककवी म्हणून आंबेडकरी चळवळीत मोठे योगदान राहिले आहे असे सांगत ना रामदास आठवले यांनी दिवंगत विनायक पाठारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

Post a Comment

0 Comments