कल्याण पूर्वेतील यु टाईप रस्ता रुंदीकरणाच्या सुनावणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी

■तर कोविड काळात सुनावणी घेतल्याने साथरोग नियंत्रण कायद्याअंर्तगत केडीएमसीवर गुन्हा दाखल करा पुनवर्सन कृती समिती कल्याण पूर्वची मागणी...


कल्याण , : कल्याण पूर्वेतील यु टाईप रस्ता रुंदीकरणाच्या सुनावणीसाठी मुदतवाढ देण्याची मागणी येथील बाधित नागरिकांनी पालिकेकडे केली असून कोविड काळात सुनावणी घेतल्याने साथरोग नियंत्रण कायद्याअंर्तगत केडीएमसीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी पुनवर्सन कृती समिती कल्याण पूर्वच्या वतीने पोलिसांकडे  करण्यात आली आहे.


      कल्याण पूर्वेतील काटेमानिवली नाका ते गणपती गणपती चौकसिद्धार्थ नगरम्हसोबा चौक ते तिसगाव नाका पर्यंत हा यु टाईप रस्ता असून १९९५२००० आणि २०१४ साली या रस्त्याचे १२ मीटर आणि १५ मीटर रुंदीकरण झाले आहे. असे असतांना आता पुन्हा ऑक्टोंबर २०२० च्या महासभेत २४ मीटर रस्ता रुंद करण्याचा  ठराव करण्यात आला. यामध्ये १६०० घरे आणि दुकाने पूर्णपणे बाधित होत आहेत. सन २००० मध्ये या रस्ता रुंदीकरणात २२ घरे तोडली. यातील कोणाचेही पुनर्वासन झाले नाही. गेली २१ वर्षे हे नागरिक पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत आहेत.


भू माफिया, विकासक, जागा मालक यांच्या फायद्या करीता कल्याण पूर्व यु टाईप रोड ८० फूट मंजुरीचा घाट घातल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे. कोविड काळातशॉर्ट नोटीस देवून ४० फुटाचा रस्ता ८० फूट करण्याची घाई महापालिका अधिकारी आणि कल्याण पूर्वेतील भू माफिया यांच्या संगनमताने प्रयत्न सुरू झाले आहेत. कोणतीही नोटीस ही १५ दिवसाच्या मुदतीत देणे अपेक्षित असताना. कोविड काळात अवघ्या दोन दिवसाची सूचना देवून सुनावणी लावण्यात आली आहे.


जवळ पास १८०० लोकं रस्तावर आणण्याचा प्रयत्न होत आहे. महापालिकेने सुनावणीसाठी  उपस्थित राहण्याकरिता मुदत वाढ दिली पाहिजे. किमान १५ दिवस पूर्वी नोटीस देण्यात यावी अशी मागणी या रस्त्यात बाधित होणारे नागरिक महापालिकेला करीत आहेत.  तर अचानक या नोटीसा पाठविल्याने लोकं भयभीत झाले असून साथरोग नियंत्रण कायद्या चे उल्लंघन केल्या बाबत सा. संचालक नगर रचना व केडीएमसी आयुक्त यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा या बाबत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असल्याची माहिती माजी नगरसेवक उदय रसाळ यांनी दिली.

Post a Comment

0 Comments