स्टडी ग्रुप कडून फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटी सोबत नवीन यूएस सहयोगाची घोषणा


मुंबई, १० जानेवारी २०२२ : स्टडी ग्रुप या आघाडीच्या आंतरराष्ट्रीय शिक्षण प्रदात्याला उत्तर अमेरिकेमधील फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीसोबत नवीन सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटी यू.एस. न्‍यूज अॅण्‍ड वर्ल्ड रिपोर्टद्वारे अव्वल सार्वजनिक उच्च शैक्षणिक संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे आणि 'नवोन्मेष्कारी व शिष्यवृत्तीच्या अग्रस्थानी राहण्याचा निश्चय असलेली उत्साही व झपाट्याने विकसित होणारी संस्था' म्हणून प्रचलित आहे.


        या संस्थेचे ३०,००० हून अधिक पदवीपूर्व व पदव्युत्तर विद्यार्थी आहेत. ही संस्था पदवीधरांना गुगल, अॅप्पल, जनरल मोटर्स आणि प्राइस वॉटरहाऊस कूपर्स अशा जागतिक कंपन्यांमध्ये रोजगार मिळण्यास साह्य करण्यासाठी ४,८०० हून अधिक इंटर्नशिप प्लेसमेंट्स देते.


      स्टडी ग्रुपच्या मुख्य कार्यकारी अधिकारी एम्मा लँकेस्टर म्हणाल्‍या, "बोका रॅटन येथील सर्वोत्तम मुख्य कॅम्पस आणि लोकप्रिय सायन्स, टेक्नोलॉजी, इंजिनीअरिंग अॅण्ड मॅथेमॅटिक्स (एसटीईएम) प्रोग्राम्समध्ये प्रबळ गुंतवणूक असलेल्या फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीला यूएसमध्ये शिक्षण घेण्याचे नियोजन करत असलेल्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय ठरण्याची अपेक्षा आहे. 


       आम्ही जगभरातील विद्यार्थ्यांना हे उत्साहवर्धक शैक्षणिक गंतव्य शेअर करण्यासाठी खूपच उत्सुक आहोत. स्टडी ग्रुपचे आंतरराष्ट्रीय विपणन, विद्यार्थी रिक्रूटमेंट आणि प्रवेश कौशल्य फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीला आंतरराष्ट्रीय विद्यार्थी रिक्रूटमेंट ध्येये संपादित करण्यामध्ये साह्य करतील. तसेच संपूर्ण युनिव्हर्सिटी समुदायाला फायदा होण्यासोबत स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च कनेक्टेड विश्‍वामधील त्यांच्या जागतिक सहका-यांकडून शिक्षण घेण्याची संधी मिळेल."


      स्टडी ग्रुप फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांची व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यावरील धोरणात्मक फोकसशी संलग्न आहे. स्टडी ग्रुपची जागतिक शिक्षणामधील त्‍यांची प्रतिष्ठा व कौशल्य आणि जगभरातील ५० हून अधिक युनिव्हर्सिटीजसोबतच्या सहयोगांमुळे आंतराष्ट्रीय विद्यार्थ्यांना प्रोग्राम्सच्या श्रेणीमध्ये रिक्रूट करण्यासाठी फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीचा विश्वसनीय सहयोगी म्हणून निवड करण्यात आली आहे. स्टडी ग्रुपला नुकतेच ग्लोबल एज्युकेशन इन्व्हेस्टर अॅवॉर्डस् येथे पाथवे प्रोव्हायडर ऑफ दि इअर पुरस्कारासह सन्मानित करण्यात आले.

Post a Comment

0 Comments