स्वामी विवेकानंद विद्या मंदिर कडून पत्रकारांचा सन्मान

 


डोंबिवली ( शंकर जाधव ) कोणत्याही परिस्थितीतसमाजातील विविध घटना बातमीच्या माध्यमातून लोकापर्यत पोहचवण्याचे काम पत्रकार करत असल्याने त्यांचा सन्मान करणे त्याच्या कामाचे कौतुक करावे या उद्देशाने डोंबिवलीतील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरकडून पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. या छोटेखानी सत्कार सोहळ्यात करोना नियमाचे पालन करण्यात आले होते.       राष्ट्रीय शिक्षण संस्थास्वामी विवेकानंद विद्यामंदिर गोपाळनगर माध्यमिक शाळेत पत्रकारिता सन्मान सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात पत्रकार राजलक्ष्मी पुजारे-जोशीशंकर जाधवबजरंग वाळुंज,महावीर बडाला, जान्हवी मौर्यमोर्ये, अभिजित पवार आणि माधवी वैद्य यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थेचे कार्यवाह संजय कुलकर्णी, संस्था पदाधिकारी विद्याधर शास्त्रीमुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी आदि मान्यवर उपस्थित होते.     शाळेला व संस्थेला दिलेल्या प्रसिद्धीबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या कुलकर्णी  यांनी सर्व पत्रकारांचे आभार मानले. कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी गणेश पाटील यांनी सांभाळली. इयत्ता १० वीतील विद्यार्थी आदित्य सरोदे याने कार्यक्रमाची सुरुवात शिवस्तुतीने केली. उपस्थित पत्रकारांचा परिचय अस्मिता पोतदार यांनी केला. तर अतिशय सुंदर कार्यक्रम पत्रिका पुष्पा नाठे यांनी तयार केली.आभार प्रदर्शन पाटील यांनी केले.

Post a Comment

0 Comments