डोंबिवली तील ज्येष्ठ बाळासाहेब प्रधान यांचे अल्पशा आजाराने निधन


डोंबिवली ( शंकर जाधव )डोंबिवलीतील ज्येष्ठ बाळासाहेब प्रधान यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
ते मृत्यू समयी ८८ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी डॉ.शुभदा प्रधान, चिरंजीव डॉ.पुष्कर प्रधान, सुन डॉ.हर्षदा प्रधान, व नातू डॉ.अथर्व प्रधान व नात स्वरांगी प्रधान आहेत.


           बाळासाहेबांनी बी.कॉम पूर्ण करून त्यांनी इन्कम टक्स कार्यालयात नोकरी केली. मात्र त्यांनी संगीताची आवड कायमच जोपासली. पत्नी मुलगा आणि सून डोंबिवलीत नामांकित डॉक्टर असून त्यांचा व्यवसाय सुरु झाल्यानतर त्यांनी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती घेतली. आपल्याला प्रत्येक कला आलीच पाहिजे हा ध्यास घेतलेल्या प्रधान काकानी भरतकाम, विणकाम, पेंटीग, जपानी पुष्परचना यासारख्या कला जोपासल्या मात्र या कलाच पैसा कमावण्यासाठी या कळ्यांचा त्यांनी कधीही उपयोग केला नाही.


              निवृत्तीनंतर त्यांनी संगीताला जणू वाहून घेतले.
त्यांनी पं एस.के. अभ्यंकर यांच्याकडे संगीताचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी पुढील अनेक वर्षे ग्वाल्हेर घराण्याचे श्रेष्ठ गायक कै. पं. डी. आर. निम्बर्णी, आणि पं गजानन बुवा जोशी यांच्याकडे त्यांनी संगीताचे शिक्षण घेतले. 


           शास्त्रीय संगीतात करिअर करु इच्छिणाऱ्या तरूण होतकरू कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी "स्वरांगण" संस्थेची स्थापना केली असून मिळणारी चार महिन्याची पेन्शन एकत्र करून या पैशातून ते या कलाकारासाठी वर्षातून ३ किंवा ४ कार्यक्रम आयोजित करून याद्वारे ते नव्या कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत होते.

Post a Comment

0 Comments